Sugar Season : साखर कारखान्याचा गळीत हंगामास सुरुवात

१५ ऑक्टोबरपासून साखर कारखान्यांनी गळीत हंगामास सुरुवात केली असली तरी हळूहळू साखर कारखाने सुरू होत आहेत.
Sugar Season
Sugar SeasonAgrowon

पुणे ः परतीच्या पावसामुळे ऊस शेतीत पाणी साचल्याने साखर कारखान्यांचा गाळप हंगाम (Sugarcane Crushing Season) उशिराने सुरू झाला आहे. १५ ऑक्टोबरपासून साखर कारखान्यांनी (Sugar Factory) गळीत हंगामास सुरुवात केली असली तरी हळूहळू साखर कारखाने सुरू होत आहेत. पुणे जिल्ह्यातील सहकारी आणि खासगी अशा एकूण ११ साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू झाला आहे, अशी माहिती प्रादेशिक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली.

Sugar Season
Sugar Stock : साखरसाठ्याची अपूर्ण माहिती दिल्यास कोटा रोखू

जिल्ह्यात परतीच्या पावसाने चांगलाच दणका दिला होता. अनेक ठिकाणी ऊस लागवडीमध्ये पाणी साचल्याने ऊसतोड बंद ठेवावी लागली होती. त्यामुळे साखर कारखान्याचा गळीत हंगाम धीम्या गतीने सुरू होता.

मागील पाच ते सहा दिवसांपूर्वी पावसाने उघडीप दिल्यानंतर गळीत हंगामास चांगली सुरुवात झाली. चालू गळीत हंगामात मोठ्या प्रमाणात उसाचे गाळप करण्याचे नियोजन कारखान्यांनी केले आहे. मात्र ऊस शेतात जुलैपासून पाणी राहिल्याने उसाची फारशी वाढ झाली नसल्याने उसाच्या उत्पादनात घट होत असल्याचे चित्र आहे.

Sugar Season
Sugarcane Transportation : ओव्हरलोड वाहतुकीविरोधात ‘बळीराजा’चा एल्गार

पुणे जिल्ह्यातील पूर्व, उत्तर भागात उसाचे दरवर्षी उत्पादन घेतले जाते. मागील वर्षी उशिरा झालेल्या पावसामुळे जवळपास सव्वा लाख हेक्टरवर उसाच्या लागवडी झाल्या असल्याची स्थिती आहे. त्यापैकी यंदा गाळपासाठी सुमारे एक लाख ५७ हजार ५७० हेक्टरवरील ऊस उपलब्ध आहे.

जिल्ह्यात आत्तापर्यंत सुरू झालेल्या ११ कारखान्यांनी चार लाख ३ हजार ९६ टन उसाचे गाळप केले आहे. त्यातून २ लाख ४७ हजार ८२५ क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. साखर उतारा सरासरी ६.१५ टक्के एवढा आहे. आतापर्यंत झालेल्या गाळपामध्ये बारामती ॲग्रोने सर्वाधिक आघाडी घेतली आहे.

या कारखान्याने एक लाख ३४ हजार ८० टन उसाचे गाळप केले आहे. त्यातून ८३ हजार १५० क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. तर साखर उतारा सरासरी ६.२ टक्के एवढा आहे. सोमेश्‍वर सहकारी साखर कारखान्याने साखर उताऱ्यात आघाडी घेतली आहे. या कारखान्याला ७.४७ टक्के एवढा साखर उतारा आहे. तर भोरमधील राजगड, शिरूरमधील घोडगंगा, दौंडमधील अनुराज, इंदापुरातील नीरा भीमा, शिरूरमधील पराग या कारखान्यांचा अद्याप गळीत हंगाम सुरू झालेला नाही.

पुणे जिल्ह्यात सुरू झालेले कारखानानिहाय उसाचे गाळप, टनामध्ये :

कारखाना --- ऊस गाळप, मे. टन -- साखर क्विंटल -- साखर उतारा टक्के

सोमेश्‍वर --- ३९,३५० -- २९,४०० -- ७.४७

दि माळेगाव -- २७,५२० -- ९,२०० -- ३.३४

श्री.छत्रपती -- २०,६११ -- १०,८०० -- ५.२४

विघ्नहर --- ३८,७७० -- २७,७०० -- ७.१४

श्री. संत तुकाराम -- १४,०२० -- ७५७५ -- ५.४

भीमा शंकर -- १४,०५० -- ७४०० -- ५.२७

श्रीनाथ म्हस्कोबा -- ३६,१५० -- २०,२५० -- ५.६

बारामती अॅग्रो -- १,३४,०८० -- ८३,१५० -- ६.२

दौंड शुगर -- ६०,३७५ -- ४१,७०० -- ६.९१

व्यंकटेशकृपा -- १८,१७० -- १०,६५० -- ५.८६

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com