
परभणी ः जून ते सप्टेंबर या कालावधीत परभणी जिल्ह्यात (Parbhani District Rainfall) सरासरी ७६१.३ मिमी पाऊस अपेक्षित असताना यंदा ६५०.४ मिमी (८५.४) टक्के, तर हिंगोली (Hingoli District Rainfall) जिल्ह्यात सरासरी ७९५.३ मिमी पाऊस अपेक्षित असताना यंदा ८८५.९ मिमी (११४.४ टक्के) पाऊस झाला.
यंदा या कालावधीत परभणी जिल्ह्यातील ४५ मंडले आणि हिंगोली जिल्ह्यातील ४ मंडलांत असे दोन जिल्ह्यांतील एकूण ४९ मंडलांत सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. सप्टेंबर महिन्यात परभणी जिल्ह्यातील पावसाची सरासरी १६९ मिमी आहे. परंतु यंदा १४०.७ मिमी (८३.३ टक्के) पाऊस झाला.
गतवर्षी (२०२१) सप्टेंबर मध्ये ३८३.६ मिमी पाऊस झाला होता. त्यातुलनेत यंदा २४२.९ मिमी एवढा कमी पाऊस झाला. यंदा सप्टेंबरमध्ये १६ मंडलात सरासपेक्षा जास्त, तर ३६ मंडलांत सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला.
जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधीतील सरासरी पावसाच्या तुलनेत यंदा ११०.९ मिमी एवढा कमी पाऊस झाला. गतवर्षी या कालावधीत ११०२.१ मिमी पाऊस झाला होता. त्या तुलनेत यंदा ४५१.७ मिमी एवढा कमी पाऊस झाला आहे.
यंदा या चार महिन्यांत आडगाव, चिकलठाणा, पाथरी, वडगाव, गंगाखेड, पालम, पेठशिवणी या ७ मंडलांत सरासरीपेक्षा जास्त, तर उर्वरित ४५ मंडलांत कमी पाऊस झाला. सप्टेंबर महिन्यात हिंगोली जिल्ह्याची पावसाची सरासरी १५४.७ मिमी आहे. यंदा प्रत्यक्षात १५४.५ (९९.९ टक्के) पाऊस झाला. सरासरीपेक्षा ०.२ मिमी एवढा कमी पाऊस झाला.
गतवर्षी (२०२१) सप्टेंबरमध्ये ३६९.६ मिमी पाऊस झाला होता. त्यातुलनेत यंदा २१५.१ मिमी कमी पाऊस झाला. जून ते सप्टेंबर या कालावधीतील पावसाची सरासरी ७९५.३ मिमी आहे. यंदा प्रत्यक्षात ८८५.५ मिमी (१११.३ टक्के) पाऊस झाला. गतवर्षी (२०२१) जून ते सप्टेंबर या कालावधीत १०८०.७ मिमी (१३५.९टक्के) पाऊस झाला होता. यंदा या कालावधीत ४ मंडलांत सरासरीपेक्षा कमी, तर २६ मंडलांत जास्त पाऊस झाला.
जून ते सप्टेंबर २०२२ सरासरीपेक्षा कमी पावसाची मंडले (टक्के)...
परभणी जिल्हा ः परभणी ८३.५ टक्के, परभणी ग्रामीण ८७.२, पेडगाव ६८.३ टक्के, जांब ६५.८, झरी ५७.४, सिंगणापूर ८३.३, दैठणा ७८.४, पिंगळी ७६.७, टाकळी कुंभकर्ण ७२.४, जिंतूर ८५.९, सावंगी म्हाळसा ८६.५, बामणी ७२.९, बोरी ८८.६, चारठाणा ८३.६ वाघी धानोरा ८९.८, दूधगाव ९२.६, सेलू ८०.९, देऊळगाव गात ९२.४, वालूर ७०.४, कुपटा ७०.१, मोरेगाव ७२.८, मानवत ८१.९, केकरजवळा ९२, कोल्हा ९९.६, ताडबोरगाव ८६.९, रामपुरी ७५.९,
हिंगोली जिल्हा ः हिंगोली ९४.८ टक्के, बासंबा ८७.८, हट्टा ८७.३.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.