Diwali Food Kit : लाभार्थ्यांना दिवाळी किटची प्रतीक्षा

दिवाळी अवघ्या एका दिवसावर आली तरी लाभार्थ्यांपर्यंत किट पोचलेले नाही.
Diwali Kit
Diwali KitAgrowon

अलिबाग : गरिबांना दिवाळी आनंदात साजरी करता यावी यासाठी पुरवठा विभागामार्फत (Maharashtra Government) साखर, रवा, पामतेल व चणाडाळीचे कीट (Diwali Food Kit) अवघ्या शंभर रुपयांत देण्याचा देखावा करण्यात आला. १५ तारखेपर्यंत हे कीट लाभार्थ्यांना मिळेल, अशी आशा होती. मात्र दिवाळी अवघ्या एका दिवसावर आली तरी लाभार्थ्यांपर्यंत किट पोचलेले नाही. त्‍यामुळे राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील (National Food Security Mission) रायगड जिल्ह्यातील चार लाख ४८ हजार ७५ लाभार्थी दिवाळी

Diwali Kit
Diwali Food Kit : ‘पिशव्यांविना’ रखडले दिवाळी किटचे वाटप

किटच्या प्रतीक्षेत आहेत.

शिधापत्रिका धारकांना शंभर रुपयांत दिवाळी कीट देण्यासाठी राज्य सरकारने गाजावाजा केला. १५ तारखेपर्यंत लाभार्थ्यांपर्यंत साखर, रवा, चणाडाळ प्रत्येकी एक किलो व पामतेल एक लिटर असे शंभर रुपयात दिवाळी कीट दिले जाणार असल्याचे सांगण्यात आले. रायगड जिल्हा पुरवठा विभागाकडून त्याचे नियोजनही करण्यात आली.

जिल्ह्यातील चार लाख ४८ हजार ७५ हजार लाभार्थ्यांची यादीही सरकारकडे पाठविण्यात आली. शंभर रुपयांत दिवाळी कीट मिळणार असल्याने लाभार्थीदेखील आनंदीत झाले होते. मात्र अजूनही दिवाळी कीट लाभार्थ्यांपर्यंत न पोचल्‍याने चर्चा सुरू झाली आहे.

जिल्ह्यातील आठ तालुक्यात दिवाळी कीट उपलब्ध झाले आहे. पनवेल व अलिबागमध्ये पूर्ण साठा आला आहे. अन्य तालुक्यातदेखील साठा उपलब्ध होणार आहे. ट्रक दिवाळी कीट घेऊन रवाना झाल्याची माहिती मिळाली आहे. आज संध्याकाळपर्यंत साठा उपलब्ध होईल.

- मधुकर बोडके,

जिल्हा पुरवठा अधिकारी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com