Ethanol GST : जीएसटी कपातीचा इथेनॉल निर्मितीला फायदा

केंद्र शासनाने इथेनॉल निर्मितीला सकारात्मक बळ देण्यासाठी उपाययोजनेचा एक भाग म्हणून इथेनॉलवरील जीएसटी सरसकट पाच टक्के केली आहे.
GST
GSTAgrowon


राजकुमार चौगुले : ॲग्रोवन वृत्तसेवा
कोल्हापूर : केंद्र शासनाने इथेनॉल निर्मितीला सकारात्मक बळ देण्यासाठी उपाययोजनेचा एक भाग म्हणून इथेनॉलवरील जीएसटी (Ethanol GST ) सरसकट पाच टक्के केली आहे. याचा सकारात्मक परिणाम इथेनॉलनिर्मिती, विक्रीबरोबरच या उद्योगातील गुंतवणूक वाढण्यावर होईल, अशी शक्यता आहे.

GST
GST : विनाब्रँड अन्नपदार्थांवर जीएसटी आता लागू

सध्याच्या प्रचलीत पद्धतीमध्ये सरकारी तेल उत्पादक कंपन्यांना इथेनॉल विक्री करायची झाली तरच कारखान्यांना जीएसटी पोटी पाच टक्के रक्कम द्यावी लागत होती. आणि इतर खासगी कंपन्यांना इथेनॉलची विक्री करायची झाली तर कारखान्यांना १८ टक्के जीएसटी द्यावा लागत होता. केंद्राने यात नुकतीच सुधारणा करताना जीएसटीची रक्कम सरसकट पाच टक्क्यांवर आणली आहे. यामुळे खासगी तेल कंपन्यांना इथेनॉलपुरवठा करताना कारखान्यांना पाच टक्केच जीएसटी भरावा लागणार आहे. जीएसटीच्या रकमेत कपात झाल्याने इतर खासगी कंपन्यांकडे कारखान्यांना विक्रीसाठी जादा प्रयत्न करता येणे शक्य झाले आहे.

या निर्णयाचा दूरगामी परिणाम म्हणून इथेनॉलच्या क्षेत्रात पुन्हा गुंतवणूक वाढण्याची शक्यता आहे. मागणीत वाढ झाली तर कारखाने येथे निर्मितीसाठी आणखी प्रवृत्त होतील, असा विश्‍वास साखर उद्योगातील तज्ज्ञांचा आहे. निर्णयाबरोबरच केंद्राने १५ डिसेंबरपासून पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉलचे मिश्रण करण्यास परवानगी दिली आहे. यामुळेही इथेनॉलच्या मागणीत वाढ अपेक्षित आहे. सध्या दहा टक्क्यांपर्यंत इथेनॉलचे मिश्रण पेट्रोलमध्ये केले जाते. याचाही सकारात्मक परिणाम इथेनॉलची गुंतवणूक वाढण्यावर होईल, अशी शक्यता आहे.

GST
GST: केंद्र सरकार खाद्यान्न आणि डाळींवर जीएसटी आकरणार

दुसरीकडे केंद्राच्या वतीने विविध योजनांद्वारे व बँकांशी समन्वय साधून इथेनॉल उत्पादन करण्यासाठी कंपन्यांनी पुढे येण्यासाठी धोरणे आखली जात आहेत. साखर कारखान्यांबरोबरच इतर पिकांवरील इथेनॉलच्या वाढीसाठीही केंद्र शासन प्रयत्न करत आहे. भविष्यात तयार झालेले इथेनॉल साठवून ठेवणे हे मोठे आव्हान ठरत असल्याने केंद्राच्या वतीने इथेनॉल साठवण्यासाठी जागा अधिग्रहित करण्याचे काम सुरू केले असल्याचे पेट्रोलियम मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले. जागा अधिग्रहित करून साठवण क्षमता वाढल्यानंतर इथेनॉलच्या खरेदी विक्रीला गती येण्याची शक्यता आहे. गेल्या दोन वर्षांपासून केंद्राच्या वतीने इथेनॉलच्या वाढीसाठी निरंतर प्रयत्न सुरू केले आहेत. याला साखर कारखान्यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिल्याने भविष्यात इथेनॉलचा वापर पेट्रोलमध्ये चांगल्या पद्धतीने होऊन इंधनाच्या आयातीवरील तेलात मोठी बचत होऊ शकते, असे साखर उद्योगातील सूत्रांनी सांगितले.

------------
कोट ः
केंद्राने इथेनॉलसाठी चांगले निर्णय घेतले आहेत. याचा फायदा साखर उद्योगाला निश्‍चितपणे होणार आहे. कारखान्याकडून इथेनॉल निर्मितीला बळ मिळेलच, परंतु विक्री करतानाही याचा फायदा होणार असल्याने जास्तीत जास्त कारखाने इथेनॉल निर्मितीत उतरतील, असा विश्‍वास आहे.
- प्रकाश नाईकनवरे, व्यवस्थापकीय संचालक, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com