बेस्ट अग्रोलाइफ’ची रॉनफेन, वॉर्डन बाजारात दाखल

‘रॉनफेन’ हे भारतातील एकमेव तीन घटकयुक्त (म्हणजे टर्नरी) कीटकनाशक (Pesticide) असून, त्यात पायरीप्रॉक्सिफेन (८ %), डायनेटोफ्युरॉन (५ %), डायफेंथुरॉन (१८ % एससी) यांचा समावेश आहे.
Pesticides
PesticidesAgrowon

कृषी क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी बेस्ट अग्रोलाइफ लिमिटेड या कंपनीने या हंगामामध्ये ‘रॉनफेन’ आणि ‘वॉर्डन’ ही दोन शेती उपयोगी उत्पादने बाजारात उतरवली आहे. एकाच वेळी महाराष्ट्रातील नागपूर, यवतमाळ, औरंगाबाद आणि जळगाव या चार ठिकाणी त्या संदर्भातील कार्यक्रम पार पडले.

या वेळी कंपनीचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर राजन कुमार, कंपनीचे नॅशनल मार्केटिंग मॅनेजर सारा नरसय्या, महाराष्ट्राचे झोनल मॅनेजर नामदेव घुले, मार्केटिंग मॅनेजर भवन भारती, विदर्भ रिजनल मॅनेजर विकास बिहाडे, खानदेश, मराठवाडा मॅनेजर अमित पवार यासह शेतकरी, वितरक, विक्रेते उपस्थित होते.

‘रॉनफेन’ हे भारतातील एकमेव तीन घटकयुक्त (म्हणजे टर्नरी) कीटकनाशक (Pesticide) असून, त्यात पायरीप्रॉक्सिफेन (८ %), डायनेटोफ्युरॉन (५ %), डायफेंथुरॉन (१८ % एससी) यांचा समावेश आहे. पिकातील सर्व रसशोषक किडींच्या नियंत्रणासाठी उपयोगी असून, त्यात दीर्घकाळ नियंत्रण देण्याची क्षमता असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

‘वॉर्डन’ हेही तिहेरी फॉर्म्यूलेशन असून, त्यात दोन बुरशीनाशक (Fungicide) आणि एक कीटकनाशक (Pesticide) तत्त्व आहे. बीजप्रक्रियेसाठी फायदेशीर अशा या मिश्रणामध्ये अझॉक्सिस्ट्रोबिन (२.५ %) अधिक थायफोनेटमिथाइल (११.२५ %) अधिक थायमेथोगझम (२५%) हे घटक आहेत. त्यामुळे पिकांची उगवण क्षमता वाढविण्यासोबतच पिकाच्या सुरुवातीच्या काळात कीड व रोगांपासून संरक्षण देण्याचे काम ते करते. त्याला शेतकऱ्यांची पसंती मिळत असल्याचाही दावा कंपनीने केला आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com