
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कन्याकुमारीपासून सुरू झालेली कॉंग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची ‘भारत जोडो’ (Bharat Jodo Yatra) पदयात्रा आता शनिवारी (ता. २४) राजधानी नवी दिल्लीत प्रवेश करणार आहे. या पदयात्रेत सुमारे २५ हजार कार्यकर्ते आणि नागरिक सहभागी होतील, असे पत्रकार परिषदेत दिल्लीचे प्रदेशाध्यक्ष अनिल चौधरी यांनी सांगितले.
राहुल गांधी भारत जोडो यांच्या पदयात्रेदरम्यान २४ डिसेंबरला राजधानी नवी दिल्लीला तिरंगामय करण्यात येणार असल्याचे चौधरी यांनी सांगितले. बदरपूर सीमेपासून ते राजघाट हा २१ किलोमीटरची पदयात्रा ज्या मार्गावरून जाणार आहे, त्या मार्गावर दोन्ही बाजूंनी राष्ट्रीय ध्वजासह कॉंग्रेसचे झेंडे लावण्यात येणार आहेत. याशिवाय कॉंग्रेसचे पोस्टर, होर्डिंग्ज, झेंडे ठिकठिकाणी लावले जाणार आहेत. यावेळी राहुल गांधी यांच्या मागे आणि पुढे ढोलताशाचे पथक असेल. अनेक ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमही सादर केले जाणार आहेत.
राहुल गांधी यांच्या भारत जोडो पदयात्रेची सात भागात विभागणी केली आहे. प्रत्येक भागाची जबाबदारी प्रत्येक कॉंग्रेस नेत्यांवर सोपवण्यात आली आहे. यात लोकसभा, विधानसभा, एमसीडीत लढलेल्या नेत्यांचा समावेश आहे. याशिवाय कार्यकर्ते देखील सामील होणार आहेत. दिल्लीतील पदयात्रेत २५ हजार नागरिकांनी सहभाग नोंदविला आहे. या यात्रेत सामील होण्यासाठी २३ डिसेंबरपर्यंत ऑनलाइन लिंक सुरू राहणार असल्याचे चौधरी म्हणाले.
नोंदणी केल्यानंतर त्याची छाननी झाल्यानंतर ई-पास दिला जाणार असल्याचे त्यांनी नमूद केले. राहुल गांधी यांच्या स्वागतासाठी सुमारे तीन हजार नेते २३ डिसेंबर रोजी बदरपूर सीमेवर पोचतील आणि ते संपूर्ण रात्रभर राहुल गांधी यांच्यासमवेत राहतील. त्याचवेळी सात ते आठ हजार कार्यकर्ते २४ डिसेंबर रोजी सकाळी बदरपूर सीमेवर पोचतील. यानुसार बदरपूर सीमेपासून राहुल गांधी सुमारे १० हजार कार्यकर्त्यांसमवेत दिल्लीत प्रवेश करतील.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.