Dr. Panjabrao Deshmukh : भाऊसाहेबांच्या पापळ गावाला मिळाली फलकामुळे ओळख

जिल्हा परिषद, राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाचा पुढाकार
National Highway
National HighwayAgrowon

अमरावती : देशाचे पहिले कृषिमंत्री आणि बहूजनांसाठी शिक्षणाची दारे उघडणारे डॉ. पंजाबराव ऊर्फ भाऊसाहेब देशमुख (Bahusabh Deshmukh) हे मूळचे अमरावती (Amaravati Papalgaon) जिल्ह्याच्या पापळ गावचे. या थोर व्यक्तिमत्त्वाच्या जन्मगावाविषयीच अनेकांना माहिती नाही. याच गावाला ओळख निर्माण करून देण्याचा प्रयत्न सामाजिक कार्यकर्ते, जिल्हा परिषद अधिकारी आणि राष्ट्रीय महामार्गाच्या (Amaravati National Highway) विशेष प्रकल्प अधिकाऱ्यांनी केला आहे. पहिल्यांदाच भाऊसाहेबांचा ठळक उल्लेख असलेला फलक महामार्गावर लावण्यात आला आहे.

National Highway
Crop Insurance : तीन तालुक्यांतील ६१ कोटींवर पीकविमा प्रलंबित

अमरावती- यवतमाळ मार्गावर अमरावतीपासून ४८ किलोमीटर अंतरावर पापळ हे जेमतेम लोकवस्तीचे गाव. या गावात भाऊसाहेब देशमुख यांचा जन्म झाला. शिक्षणानंतर राजकारणात प्रवेश केलेल्या भाऊसाहेबांनी देशाच्या कृषिमंत्री पदाची जबाबदारी पहिल्या मंत्रिमंडळात सांभाळली. शेतकऱ्यांसाठी सर्मपण भाव ठेवणारा नेता म्हणून त्यांची ओळख होती.

National Highway
Crop Damage : मका पिकात वन्यप्राण्यांचा उपद्रव

पंजाबरावांनी देश अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण व्हावा, याकरिता नव्या व उत्पादकता वाढीला, पोषक तंत्रज्ञानाला प्रोत्साहन दिले. त्यापुढील काळात त्यांनी श्री शिवाजी शिक्षण संस्थेची उभारणी करून बहूजनांसाठी शिक्षणाची दारे उघडी केली. अशा मोठ्या उंचीच्या नेत्याचे जन्मगाव मात्र देशाच्या नकाशावर दुर्लक्षित राहिले.

अमरावती येथील सामाजिक कार्यकर्ते प्रदीप पाटील यांनी ही बाब जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम टेकाळे यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यांनी तत्काळ राष्ट्रीय महामार्गाचे विशेष प्रकल्प अधिकारी राजेश सोनवाल यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. सोबतच संबंधित बांधकाम विभागाकडे पत्राच्या माध्यमातून पाठपुरावाही केला. परिणामी, बांधकाम विभागाकडून अमरावती-यवतमाळ मार्गावर धानोरा गावानजीक भाऊसाहेबांच्या पापळ गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर दिशादर्शक फलक लावण्यात आला आहे.

फलकावर असा उल्लेख...

१९६५ मध्ये भाऊसाहेब निवर्तले. त्यानंतर पहिल्यांदाच त्यांचा नामोल्लेख असलेला दिशादर्शक फलक लावण्याचे काम झाले आहे. ‘स्वतंत्र भारताचे पहिले कृषिमंत्री, शिक्षण महर्षी डॉ. पंजाबराव ऊर्फ भाऊसाहेब देशमुख यांचे जन्मगाव पापळ १२ किलोमीटर’ असा उल्लेख या फलकावर आहे.

भाऊसाहेबांचे गाव शैक्षणिक तीर्थस्थानच आहे. त्यामुळे त्या रस्त्याने जाणाऱ्या सर्वांना त्याविषयी माहिती असावी. यामुळेच त्यांच्या नावासह उल्लेख असलेला फलक लावण्यासाठी पाठपुरावा केला. त्याला विशेष प्रकल्प विभागाकडून सहकार्य मिळाले.

- तुकाराम टेकाळे,

उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, अमरावती

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com