Sugarcane Policy : ‘भीमाशंकर’कडून मेअखेर ऊस लागवडीचे धोरण जाहीर

आंबेगाव तालुक्यातील दत्तात्रेयनगर, पारगाव येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने लागवड हंगाम २०२२-२३ मध्ये ऊस लागवडीसाठी मेअखेरपर्यंत वाढीव मुदतवाढ दिली आहे.
Sugarcane
SugarcaneAgrowon

Sugarcane Crushing Season पुणे : आंबेगाव तालुक्यातील दत्तात्रेयनगर, पारगाव येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने लागवड (Sugarcane Cultivation) हंगाम २०२२-२३ मध्ये ऊस लागवडीसाठी मेअखेरपर्यंत वाढीव मुदतवाढ दिली आहे.

यामध्ये को ८६०३२, को.व्ही.एस.आय. १८१२१, एम.एस. १०००१ जातीचा समावेश आहे. या वाणाच्या नोंदीचा ऊसगाळप हंगाम २०२३-२४ अखेरीस तोडणी (Sugarcane Harvesting) करण्यात येणार असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे यांनी दिली.

श्री. बेंडे म्हणाले, की महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री व कारखान्याचे संस्थापक दिलीप वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक मंडळाची सभा घेण्यात आली.

चालू वर्षी ऊस लागवड कमी झाल्याने व खोडवा ऊस राखण्याचे प्रमाण कमी असल्याने झालेल्या निर्णयानुसार मे २०२३ अखेर को ८६०३२, को.व्ही.एस.आय. १८१२१, एम.एस. १०००१ जातीच्या ऊस लागवडीस मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे.

Sugarcane
Sugarcane Cultivation : वर्धा जिल्ह्यात ऊस लागवड क्षेत्रात घट

ऊसगाळप हंगाम २०२३-२४ मध्ये गाळपास घेण्याचे निश्‍चित केले आहे. त्यामुळे सध्या कांदा, भाजीपाला, तरकारी पिके इ. काढल्यानंतर ऊस उत्पादकांना एप्रिल २०२३ मध्ये बेण्याद्वारे, ऊस रोपांद्वारे व माहे मे २०२३ मध्ये फक्त रोपांद्वारे ऊस लागवड करतील त्यांची ऊस नोंद घेऊन गाळप हंगाम २०२३-२४ अखेरीस तोडणी केली जाणार आहे.

आडसाली उसाची लागवड मोठ्या प्रमाणात असल्याने उसाची तोडणी १७ ते १८ महिन्यांनंतर होत आहे.

Sugarcane
Sugarcane FRP : सोलापुरात ‘एफआरपी’ मिळेना

कारखान्याचे वरील धोरण कालावधीत लागवड केलेला ऊस १० ते ११ महिन्यांतच गाळपास जाणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये लागवड करण्याबाबत सकारात्मक भूमिका दिसून येत आहे.

लागवड मुदतवाढ योजना कार्यक्षेत्र व परिसरातील गटातील गावांमध्ये राबविण्यात येणार आहे. त्यासाठी आवश्यक बेणे, ऊस रोपे, जिवाणू खते, रासायनिक खते इ. पुरवठा प्रचलित ‘दत्तात्रय वळसे पाटील ऊस उत्पादकता वाढ’ या ऊस विकास योजनेतील धोरणानुसार केला जाणार आहे.

अनुदानावर मिळणार पाचट कुट्टी

कारखान्याने यापूर्वी पुढील हंगामात गाळपास येणाऱ्या खोडवा उसासाठी १०० प्रति टन रुपये अनुदानपर जादा दर, तसेच १०० टक्के अनुदानावर (मोफत) पाचट कुट्टी व ५० टक्के अनुदानावर कारखाना उत्पादित जिवाणू खतेवाटप करण्याची योजना जाहीर केलेली असून, या बाबींचा विचार करता जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी वरीलप्रमाणे एप्रिल २०२३ मध्ये को ८६०३२, को.व्हीएसआय. १८१२१, एम.एस. १०००१ जातीच्या बेणेद्वारे, ऊस रोपांद्वारे व माहे मे २०२३ मध्ये फक्त ऊस रोपांद्वारे ऊस लागवड करावी, असेही श्री बेंडे म्हणाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com