Agriculture Department : कृषी उपसंचालक भोकरे यांना निवृत्तीच्या आदल्या दिवशी बढती

रविवारी शेतकऱ्यांकडून सत्कार; कृषी विभागाकडून थट्टा
Agriculture Department
Agriculture DepartmentAgrowon

अॅग्रोवन वृत्तसेवा
जळगाव ः शासनाच्या कृषी विभागातील (Agriculture Department) उपसंचालक अनिल भोकरे (Anil Bhokare) हे मंगळवारी (ता. २८) सेवानिवृत्त झाले. निवृत्तीच्या आदल्या दिवशी म्हणजेच सोमवारी (ता. २७) त्यांना कृषी विभागाने बढती दिली. त्यांना बढती देण्यास विलंब झाला.

वेळीच बढतीचे आदेश जारी केले असते, तर कृषी विस्तार कार्यास लाभ मिळाला असता. याशिवाय भोकरे यांच्या कामाचाही योग्य सन्मान कृषी विभागाने केल्याचे समाधान शेतकऱ्यांना मिळाले असते, असा मुद्दा चर्चिला जात आहे.

श्री. भोकरे यांनी आपल्या सेवेत कमाल कार्यकाळ जळगाव जिल्ह्याची सेवा केली. मध्यंतरी त्यांची जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेत नियुक्ती झाली होती.

वसुंधरा पाणलोट विकास कार्यालयातही त्यांनी जळगावात सेवा केली. त्यांची बढती काही वर्षांपूर्वीच अपेक्षित होती.

परंतु बढती मिळाली नाही. शेवटी निवृत्तीच्या आदल्या दिवशी जळगाव येथे ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक म्हणून त्यांना बढती मिळाली.

शेतकऱ्यांनी त्यांचा भव्य सत्कार कार्यक्रमही आयोजित केला आहे. रविवारी (ता. ५) हा कार्यक्रम जळगाव शहरातील महाबळ परिसरातील छत्रपती संभाजीराजे सभागृहात दुपारी १ वाजता होणार आहे.


Agriculture Department
Agriculture Department : पदोन्नती फाइल रखडवल्याने उपसंचालक आंदोलन करणार

सेवाज्येष्ठतेचा हक्क हिरावला
महाराष्ट्र कृषी सेवा (गट अ) कृषी उपसंचालक संवर्गातून महाराष्ट्र कृषी सेवा (गट अ) अधीक्षक कृषी अधिकारी संवर्गात तात्पुरता पदोन्नतीसाठी कृषी विभागाने तयार केलेल्या २०२१-२२ च्या निवड सूचीस सामान्य प्रशासन विभागाने सहमती दिली आहे.

यानुसार भोकरे यांना कृषी सेवा गट अ संवर्गातून सार्वजनिक सेवेच्या हितार्थ व प्रशासकीय सोईच्या दृष्टीने महाराष्ट्र कृषी सेवा गट अ अधीक्षक कृषी अधिकारी या संवर्गात निव्वळ तात्पुरत्या पदोन्नतीने निवृत्तीच्या आदल्या दिवशी म्हणजेच मंगळवारी (ता. २७ फेबुवारी २०२३) पदस्थापना देण्यात आली. ही पदोन्नती केवळ तात्पुरत्या स्वरूपाची आहे.

यामुळे भोकरे यांना सेवाज्येष्ठतेचा हक्क सांगता येणार नाही. कारण पदोन्नतीनंतर लागलीच दुसऱ्या दिवशी म्हणजेच २८ फेब्रुवारी २०२३ रोजी (बुधवार) ते सेवानिवृत्त झाले आहेत.

यापूर्वीही असाच प्रकार इतर अधिकाऱ्यांच्या बाबतीत झाला आहे. ही या अधिकाऱ्यांची वरिष्ठ यंत्रणांनी केलेली जणू थट्टाच आहे, असा मुद्दाही ऐरणीवर आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com