Paddy Harvesting : भुदरगडला भात कापणी अंतिम टप्प्यात

भातकापणीच्या सुरुवातीलाच परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली होती, पण आता थोडी विश्रांती घेतल्याने भात कापणीला वेग आला आहे.
Paddy Harvesting
Paddy Harvesting Agrowon

पिंपळगाव, जि. कोल्हापूर : भातकापणीच्या (Paddy Harvesting) सुरुवातीलाच परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली होती, पण आता थोडी विश्रांती घेतल्याने भात कापणीला वेग आला आहे. भुदरगड तालुक्यासह पिंपळगाव परिसरात आता भात कापणी जोरात सुरू झाली आहे.

Paddy Harvesting
Cereal Crop : पौष्टिक तृणधान्य क्रांतीसाठी...

भुदरगड तालुक्यातील पिंपळगाव परिसरात भात कापणीला सुरुवात झाली आहे. हातातोंडाशी आलेले पीक पदरात पाडून घेण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे. या मुळे एकच धांदल उडाली आहे. मजूर मिळेनासे झाले आहेत मजुरांअभावी पीक वाया जाते की काय अशी अवस्था शेतकरी वर्गाची झाली आहे.

Paddy Harvesting
Paddy Harvesting : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भातकापणी ९० टक्के पूर्ण

भात पिकाची मळणी करण्यासाठी अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतपत सुद्धा बैलजोडी शिलक राहिलेली नाही. ग्रामीण भागात पूर्वी बैलांच्या सहाय्याने भात मळणी केली जात असे. मजूर मिळत नसल्याने एकमेकांच्यात आदलाबदल (पैरा) पद्धतीने भात कापणी करून घेत आहेत. पिंपळगाव सह दिंडेवाडी, मानवळे, पाल, हेळेवाडी, नागणवाडी, बेगवडे, आरळगुंडी, भेंडवडे नांगरगाव, बारवे आदी भागांत भात पिकांचे जास्त क्षेत्र आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com