Lasalgaon Market : लासलगाव बाजार समितीतील भुईकाटा बंद

शेतकरी व व्यापाऱ्यांची गैरसोय होत आहे. त्यामुळे वजन करण्यासाठी दुसऱ्या आवारात वाहने न्यावी लागत आहेत. हा भुईकाटा तत्काळ सुरू करावा,
Lasalgaon
LasalgaonAgrowon

नाशिक : जिल्ह्यातील प्रमुख बाजारपेठ असलेल्या लासलगाव बाजार (Lasalgaon APMC) समितीमधील मुख्य आवारातील सेमी इलेक्ट्रॉनिक भुईकाटा (Semi Electric Weighing Scale) सध्या बंद आहे. परिणामी, शेतकरी व व्यापाऱ्यांची गैरसोय होत आहे. त्यामुळे वजन करण्यासाठी दुसऱ्या आवारात वाहने न्यावी लागत आहेत. हा भुईकाटा तत्काळ सुरू करावा,

Lasalgaon
Lumpy Vaccination : जिल्ह्यात ६१ टक्के जनावरांचे लसीकरण पूर्ण

अशी मागणी शेतकरी करत आहेत. तर बाजार समिती प्रशासनाकडून काटा सुरू करण्यासाठी हालचाली सुरू आहेत. मुख्य आवारात गेल्या ३० वर्षांपूर्वी सेमी इलेक्ट्रॉनिक भुईकाटा बसवण्यात आला होता; मात्र खालच्या भागात सड झाल्याने तो आता वापरायोग्य राहिलेला नाही. या पार्श्वभूमीवर कुठलीही जीवित व वित्तहानी नको,

Lasalgaon
Lumpy Skin : सात जिल्ह्यांत मृत जनावरांच्या संख्येने ओलांडली शंभरी

त्यासाठी बाजार समितीने खबरदारीचा पर्याय म्हणून तो सध्या बंद ठेवलेला आहे; मात्र तो बंद असल्याने शेतकऱ्यांना दुसऱ्या आवारात किंवा खासगी काट्यावर जाऊन वजन करावे लागत आहे. त्यामुळे काहीशी गैरसोय होत आहे.

एकीकडे बाजार समितीच्या संचालक मंडळाचा कार्यकाळ संपुष्टात आलेला आहे. या पार्श्वभूमीवर न्यायालयाच्या आदेशानुसार कुठलाही धोरणात्मक निर्णय व्यवस्थापनाला घेता येत नाही. त्यामुळे प्रशासनाकडून हा काटा सुरू करण्यासाठी वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा सुरू आहे. त्यामुळे परवानगी मिळताच काटा पुन्हा लवकर करण्यात येईल,

अशी माहिती बाजार समितीचे सचिव नरेंद्र वाढवणे यांनी दिली. बाजार समितीने लवकरात लवकर वजन काटा बसवून शेतकरी व व्यापाऱ्यांची गैरसोय दूर करावी. तसेच खासगी काट्यावर वजन करताना जो आर्थिक भुर्दंड सोसावा लागत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

मुख्य आवारातील भुईकाटा जुना झाला असून तो सडलेला आहे. त्यामुळे वजन करताना काही अपघात नको म्हणून बंद आहे. या पार्श्वभूमीवर तो नवा बसविण्याची गरज असल्याने बाजार समितीकडून हालचाली सुरू आहेत.

- नंदकुमार डागा, अध्यक्ष, लासलगाव व्यापारी असोसिएशन

काटा बंद असल्याचे समजल्यानंतर तत्काळ बाजार समिती सचिवांची भेट घेऊन चौकशी केली. त्यांनी भुईकाटा दुरुस्तीकरिता एक ते दीड महिना वेळ लागेल, असे उत्तर दिले. त्यामुळे जिल्हा उपनिबंधक यांच्याशी संपर्क साधून निवेदन दिले आहे. लक्ष घालून भुईकाटा सुरू करण्याबाबत मागणी केली आहे.

- प्रकाश पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com