Bhupendra Patel : भूपेंद्र पटेल सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्री

६२ वर्षीय भूपेंद्र पटेल यांनी सोमवारी (ता. १२) गुजरातचे १८ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. गांधीनगर येथील सचिवालयाच्या हेलिपॅड मैदानावर राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी दुपारी दोन वाजता पटेल यांना शपथ देवविली.
Bhupendra Patel
Bhupendra PatelAgrowon

गांधीनगर/सिमला (वृत्तसंस्था) : ६२ वर्षीय भूपेंद्र पटेल (Bhupendra Patel) यांनी सोमवारी (ता. १२) गुजरातचे १८ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. गांधीनगर येथील सचिवालयाच्या हेलिपॅड मैदानावर राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी दुपारी दोन वाजता पटेल यांना शपथ देवविली.

Bhupendra Patel
Narendra Modi: किसान संघाचा मोदी सरकारला घरचा अहेर

भूपेंद्र पटेल यांच्यानंतर १६ मंत्र्यांनी शपथ घेतली. यात आठ कॅबिनेट, दोन स्वतंत्र प्रभार असलेले मंत्री आणि सहा राज्यमंत्र्यांचा समावेश आहे. या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री यांची प्रमुख उपस्थिती होती.

Bhupendra Patel
Gujarat Election Result : गुजरातेत भाजपच; हिमाचलमध्ये काँग्रेस

दोनशेपेक्षा अधिक संतांनी शपथविधीत सहभाग घेतला होता. या सोहळ्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रामदास आठवले, स्मृती इराणीदेखील उपस्थित होत्या. भूपेंद्र पटेल हे सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्री होणारे पाटीदार समुदायातील एकमेव नेते आहेत.

सुखविंदर सुक्खू यांनी घेतली शपथ

हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसने बहुमत मिळवल्यानंतर रविवारी (ता. ११) सुखविंदर सुक्खू यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. ते हिमाचलचे पंधरावे मुख्यमंत्री असतील. निवडणुकांचे कल येताच दिवंगत नेते व माजी मुख्यमंत्री वीरभद्रसिंह यांच्या पत्नी प्रतिभा सिंह यांनी मुख्यमंत्रिपदावर दावा केला होता. वीरभद्रसिंह यांच्या निधनानंतर काँग्रेसने प्रतिभा सिंह यांच्यावर पक्षाची जबाबदारी दिली. त्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष आहेत.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com