Cooperative Spinning Mill : प्रियदर्शिनी सूतगिरणी अध्यक्षपदी भूपेश पटेल, उपाध्यक्षपदी चव्हाण

येथील प्रियदर्शिनी सहकारी सूतगिरणीच्या अध्यक्षपदी भूपेश पटेल तर उपाध्यक्षपदी प्रभाकर चव्हाण यांची शनिवारी (ता.१२) बिनविरोध निवड करण्यात आली.
Cooperative Spinning Mills
Cooperative Spinning MillsAgrowon

शिरपूर, जि.धुळे : तांडे (ता. शिरपूर) येथील प्रियदर्शिनी सहकारी सूतगिरणी (Cooperative Spinning Mills) च्या अध्यक्षपदी भूपेश पटेल तर उपाध्यक्षपदी प्रभाकर चव्हाण यांची शनिवारी (ता.१२) बिनविरोध निवड करण्यात आली.

Cooperative Spinning Mills
CIBIL Agri Loan: शेती कर्जांना ‘सीबील’मधून वगळण्याच्या मागणी | ॲग्रोवन

अध्यक्ष, उपाध्यक्षांची निवड करण्यासाठी निवडणूक अधिकारी मनोज चौधरी यांनी सूतगिरणीच्या कार्यालयात संचालकांची विशेष सभा झाली. अध्यक्षपदासाठी भ पटेल तर उपाध्यक्षपदासाठी चव्हाण यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्यामुळे त्यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा श्री. चौधरी यांनी केली.

त्यांना अमोल एंडाइत, रवींद्र चौधरी यांनी सहकार्य केले. संचालक मंडळातर्फे श्री. पटेल, श्री. चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला. संचालक गोपाल भंडारी, जनार्दन पाटील, संग्रामसिंह राजपूत, नामदेव चौधरी, रमेश कोळी, जगतसिंह राजपूत, भरत पाटील, आशिष चौधरी, संदीप देवरे, अजितकुमार शाह, वासुदेव पटले, सत्तारसिंह पावरा, रंजना गुजर, मेघा पाटील, सुदाम भलकार उपस्थित होते.

Cooperative Spinning Mills
Crop Damage Compensation : नुकसानीच्या मदतीसाठी हवेत ८७७ कोटी रुपये

सूतगिरणीचे संस्थापक, आमदार अमरिशभाई पटेल, आमदार काशिराम पावरा यांच्या नेतृत्वाखाली सूतगिरणीच्या संचालकांची निवडणूक बिनविरोध करण्यात आली होती. नूतन संचालक मंडळ २०२२ ते २०२७ या कालावधीसाठी काम पाहणार आहे.

नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे आमदार अमरिशभाई पटेल, आमदार काशिराम पावरा, शिरपूर एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, शिरपूर मर्चंट बँकेचे अध्यक्ष कैलासचंद्र अग्रवाल, एफ. डी. पाटील, सल्लागार पंकज जाजू, एस. के. महाजन, शरद मिस्त्री, आनंद पाटील, किशोर कुलकर्णी आदींनी अभिनंदन केले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com