Leopard Safari : जुन्नर बिबट्या सफारीसाठी अर्थसंकल्पात घोषणा

गेल्या अर्थसंकल्पात तत्कालीन अर्थमंत्री अजित पवार यांनी गाडीखेल (ता. बारामती) येथील बिबट्या सफारीसाठी ६० कोटींची तरतूद केली होती.
Leopard Safari
Leopard SafariAgrowon

Maharashtra Budget 2023 पुणे ः मानव-बिबट्यातील संघर्ष (Human Leopard Clash) कमी करण्याबरोबरच बिबट्या सफारीद्वारे पर्यटन विकास आणि रोजगार निर्मितीसाठी (Employment Generation) उभारण्यात येत असलेल्या जुन्नर बिबट्या सफारीची (Leopard Safari) घोषणा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanavis) यांनी केली. मात्र यासाठी कोणतीही आर्थिक तरतूद नसल्याने संभ्रम निर्माण झाला आहे.

गेल्या अर्थसंकल्पात तत्कालीन अर्थमंत्री अजित पवार यांनी गाडीखेल (ता. बारामती) येथील बिबट्या सफारीसाठी ६० कोटींची तरतूद केली होती. मात्र विरोधानंतर आणि सत्तांतरानंतर बारामतीची बिबट्या सफारी रद्द करत मूळ जुन्नरला करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतला.

Leopard Safari
Leopard Attack : कांदा चाळीचे कुंपण तोडून बिबट्याकडून कालवड फस्त

उत्तर पुणे जिल्ह्यातील जुन्नर, खेड, आंबेगाव, शिरूर या तालुक्यांमध्ये आणि नगर जिल्ह्यातील अकोले, संगमनेर, श्रीगोंदा आणि पारनेर या तालुक्यांमध्ये गेल्या २० वर्षांपासून बिबट्या आणि मानव संघर्ष वाढला आहे. प्राथमिक पातळीवर वनक्षेत्रालगत असलेला हा संघर्ष आता मानवी वस्तीवर येऊन धडकला आहे.

Leopard Safari
Leopard Attack : शिंदवड येथे द्राक्षाच्या बागांमध्ये बिबट्याचा वावर

हा संघर्ष कमी करण्यासाठी उसात स्थिरावलेल्या आणि मानवी वस्तीपर्यंत आलेल्या बिबट्यांना एकत्र करत, बिबट्या सफारीची संकल्पना माजी आमदार शरद सोनवणे यांनी २०१८ मध्ये मांडली.

यानंतर प्रशासकीय पातळीवर विविध टप्प्यांवर या सफारीबाबत विचार विनिमय होऊन, आंबेगव्हाण येथे जागा वन विभागाद्वारे अंतिम करण्यात आली. यानंतर आता या प्रकल्पाचा सविस्तर विकास आराखडा तयार झाला आहे.

या आराखड्यानुसार सफारीसाठी अर्थसंकल्पात घोषणा करण्यात आली. मात्र ठोस आर्थिक तरतूद नसल्याने संभ्रम आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com