Agriculture Electricity
Agriculture ElectricityAgrowon

Agriculture Electricity : कृषिपंपांच्या वीज दरात मोठी वाढ

राज्याला वीजपुरवठा करणाऱ्या महावितरण कंपनीने पुढील दोन वर्षांसाठी दरवाढ जाहीर केली असून लघुदाब आणि उच्चदाब कृषिपंपांसाठी ४ रुपये १७ पैसे ते ८ रुपये ५९ पैसे प्रतियुनिट वाढ करण्यात आली आहे.

Mumbai News : राज्याला वीजपुरवठा करणाऱ्या महावितरण कंपनीने (Mahavitaran) पुढील दोन वर्षांसाठी दरवाढ (Electricity Rate) जाहीर केली असून लघुदाब आणि उच्चदाब कृषिपंपांसाठी ४ रुपये १७ पैसे ते ८ रुपये ५९ पैसे प्रतियुनिट वाढ करण्यात आली आहे. २०२३-२४ मध्ये ९.३० तर २०२४-२५ या वर्षात २०.९३ टक्के वाढ करण्यात आली आहे.

महावितरणसह अन्य खासगी कंपन्यांनीही वाढ केली आहे. मात्र, महावितरणने केलेली दरवाढ अधिक आहे.

राज्य वीज नियामक आयोगाने महावितरण, बेस्ट, टाटा आणि अदानी वीज कंपनीचे २०२३-२४ आणि २०२४-२५ चे घरगुती, कृषी, औद्योगिक आणि वाणिज्यिक दर जाहीर केले आहेत. महसुली तूट भरून काढण्यासाठी कंपन्यांनी दरवाढीची मागणी केली होती.

महावितरणची महसुली तूट ६७ हजार ६४३ कोटी रुपये असून आयोगाने ३९ हजार ५३७ कोटी रुपयांची वाढ मंजूर केली आहे.

Agriculture Electricity
Agriculture Pump Electricity Supply : दोन वर्षांत कोल्हापूर, सांगलीत ३३ हजार कृषिपंपांना वीजजोडणी

लघुदाब शेतकऱ्यांच्या कृषिपंपासाठी स्थिर आणि मागणी आकारात ४३ रुपये हॉर्सपॉवर दर आकारला जात होता. तो २०२३ -२४ मध्ये ४७ तर २०२४-२५ मध्ये ५२ रुपये करण्यात आला आहे.

तर शेती आणि इतर कारणासाठी वीजेसाठी हॉर्सपॉवरसाठी ११७ रुपये दर आकारला जात होता. तो २०२३-२४ मध्ये १२९ रुपये तर २०२४-२५ मध्ये १४२ रुपये दर आकारला जाणार आहे. ही टक्केवारी अनुक्रमे १०.२९ आणि २१.३७ टक्के आहे.

युनिटनुसार दर आकारणीमध्ये सध्या लघुदाब शेतीपंपांसाठी ३.३० पैसे प्रतियुनिट दर आकारला जात होता. तो आता २०२३-२४ मध्ये ४.१७ रुपये आणि २०२४-२५ मध्ये ४.५६ रुपये प्रतियुनिट दर आकारला जाणार आहे.

शेती आणि इतर ग्राहकांसाठी सध्या ४. ३४ रुपये प्रतियुनिट दर आकारला जात होता. २०२३-२४ मध्ये ६.२३ रुपये तर २०२४-२५मध्ये ६.८८ रुपये दरवाढ करण्यात आली आहे.

उच्चदाब कृषिपंपांसाठी सध्या ४.२४ रुपये दर आकारला जात होता. तो २०२३-२४मध्ये ५.९६ रुपये तर २०२४-२५ मध्ये ६.३८ रुपये दर आकारला जाणार आहे.

कृषी आणि इतर कारणासाठी सध्या ५.६५ रुपये दर आकारला जातो तो २०२३-२४ साठी ७.८७ तर २०२४-२५ साठी ८.५९ रुपये दर आकारला जाईल.

उच्चदाब कृषिपंपांसाठी स्थिर मागणी आकार ८० रुपये प्रतिकेव्हीए दर आकारला जातो तो २०२३-२४ साठी ८८ रुपये प्रतिकेव्हीए आणि २०२४-२५ साठी ९७ रुपये प्रतिकेव्हीए दर आकारला जाणार आहे. ही दरवाढ अनुक्रमे १० ते २१. २५ टक्के करण्यात आली आहे.

Agriculture Electricity
Agriculture Electricity : शेतीला दिवसा वीज द्या

सर्वाधिक वाढ कृषीची

उच्चदाब कृषिपंपांची प्रतियुनिट दरवाढ २०२३-२४ साठी ३८.२१ टक्के, शेती आणि इतर वीज वापरासाठी ३९.२९ तर २०२४-२५ साठी ५०.४७ तर शेती आणि इतर वीज वापरासाठी ५२. ३ टक्के वाढ करण्यात आली आहे

तर लघुदाब शेतीपंपांसाठी अनुक्रमे २६.३६ आणि ३८.१८ टक्के तर शेती आणि इतर वीज वापरासाठी २०२३-२४ साठी ३४.२७ आणि २०२४-२५ साठी ४८.२८ टक्के वाढ करण्यात आली आहे.

महावितरणने केलेली दरवाढ सर्वाधिक शेती क्षेत्रावर केली आहे. त्यामुळे आगामी काळात शेतकऱ्यांवर वीजदरवाढीचे मोठे संकट येणार असल्याची भीती वीजतज्ज्ञ प्रताप होगाडे यांनी व्यक्त केली.

महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने आज महावितरण कंपनीच्या फेरआढावा तथा दरवाढ याचिकेवरील निर्णय जाहीर केला आहे.

या निर्णयानुसार कंपनीला आगामी दोन वर्षात अतिरिक्त महसूल ३९५६७ कोटी रुपये मिळणार आहे. याचा अर्थ वाढीव वसूल केली जाणारी रक्कम म्हणजेच खरी दरवाढ २१.६५ टक्के आहे.

आयोगाचा आदेश सर्वसामान्य वीज ग्राहकांना फसवणारा, धूळफेक करणारा आहे. या आदेशाच्या विरोधात विद्युत अपिलीय प्राधिकरण, नवी दिल्ली यांच्याकडे अपील दाखल करण्यात येईल आणि दाद मागण्यात येईल.

- प्रताप होगाडे, वीजतज्ज्ञ

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com