
अकोला ः जिल्ह्यात पहिल्यांदाच खरीप हंगामाच्या (Kharif Season) दृष्टीने शेतकऱ्यांना घरगुती बियाणे उपलब्ध (Seed Availability) व्हावे, या उद्देशाने बियाणे महोत्सव (Seed Festival) भरवण्यात आला आहे. एक ते सहा जून या काळात हा महोत्सव सुरू आहे. बार्शीटाकळी येथील केंद्रावर या महोत्सवास मोठा प्रतिसाद मिळत आहे.
बार्शीटाकळी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात होत असलेल्या या महोत्सवात ३६० शेतकऱ्यांनी घरचे सोयाबीन बियाणे विक्रीसाठी उपलब्ध करून दिले आहे. या महोत्सवाचे उद्घाटन तहसीलदार गजानन हामंद, जिल्हा परिषद सदस्य गोपाल भटकर, गणेश बोबडे, भाजप तालुकाध्यक्ष काकड, तालुका कृषी अधिकारी विलास वाशीमकर, पंचायत समितीचे कृषी अधिकारी संजय चांदुरकर, प्रहारचे जिल्हा उपाध्यक्ष बंटी पाटील यांच्यासह उपसभापती, पंचायत समिती सदस्य उपस्थित होते.
गेल्या चार दिवसांपासून या महोत्सवाला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या ठिकाणी सुमारे ४०० क्विंटलपेक्षा अधिक बियाण्यांची विक्री झाली. तसेच शेतकऱ्यांनी बियाण्यांची नोंदणीही मोठ्या प्रमाणात केली असल्याची माहिती वाशीमकर यांनी दिली.
आता उरले दोन दिवस
या महोत्सवाचा शिवराज्यभिषेकदिनी सोमवारी (ता. ६) समारोप होईल. शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त संख्येने महोत्सवात सहभागी होऊन खात्रीशीर बियाणे खरेदी करावे, असे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.