Water Supply : पाणीबाणीतही लाखोंची बिले

शहरातील पश्चिम भागात एन. आर. नगर, क्रिश कॉलनी, नागवाडी, बंदर आळी, बालदा नगर, गणेश चौक, दिवा गाव या भागात गेली अनेक वर्षे ठाणे महापालिकेकडून अत्यल्प पाणीपुरवठा केला जातो.
Water Supply
Water SupplyAgrowon

दिवा : शहरातील पश्चिम भागात एन. आर. नगर, क्रिश कॉलनी, नागवाडी, बंदर आळी, बालदा नगर, गणेश चौक, दिवा गाव या भागात गेली अनेक वर्षे ठाणे महापालिकेकडून अत्यल्प पाणीपुरवठा (Water Supply) केला जातो; तरीही महापालिकेकडून लाखोंची बिले या भागातील इमारतींना दिलेली आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी आहे.

Water Supply
Water Purity : पाण्याच्या शुद्धतेसाठी ‘भूजल’ने केल्या १७८ प्रयोगशाळा

दिवा पश्चिम भागात एन. आर. नगर, क्रिश कॉलनी, नागवाडी, बंदर आळी, बालदा नगर, गणेश चौक, दिवा गाव हे विभाग येतात. या विभागांसाठी मुंब्र्याच्या बाजूने जुनी पाईपलाईन टाकून पाणी पुरवले जात होते; पण या विभागाची लोकसंख्या वाढत असून येथील लोकांना आधीपासूनच कमी दाबाने पाणीपुरवठा केला जात असे. आता ते पाणीही कमी पडते आहे. तसेच तेथील काही इमारतींमध्ये गढूळ, दुर्गंधीयुक्त पाणी येते आहे. तसेच दिवा हा भाग ठाणे शहराच्या शेवटच्या टोकाला असल्यामुळे या विभागाला पाणी पोहचत नाही, असे पालिकेकडून सांगितले जाते.

गेल्या अनेक वर्षांत या विभागातून पाणीटंचाई दूर व्हावी किंवा या विभागातील नागरिकांना ठाणे महानगरपालिकेचे पाणी मिळावे, यासाठी विविध पक्षांनी, नागरिकांनी अनेक निवेदने, आंदोलने व उपोषणे केली; तरीही पाणीप्रश्न ‘जैसे थे’ आहे.

Water Supply
Sugar Cane Factory : ‘श्री संत एकनाथ घायाळ शुगर’चा गळीत हंगाम प्रारंभ

बऱ्याच इमारतींना नियमित बिल न पाठवता अचानक या इमारतींना लाखोंची बिले पाठवल्यामुळे रहिवासी संतप्त झाले आहेत. ही लाखोंच्या घरातील पाणीबिले भरणे हे इथल्या सामान्य रहिवाशांच्या आवाक्याबाहेर आहे. शिवाय पाणीपुरवठा केलेला नसतानाही बिल भरणे, बिले पाठवणे आणि ती रहिवाशांना भरायला लावणे हे चुकीचे आहे, असे नागरिकांचे म्हणणे आहे.

पलावा येथून येणाऱ्या मुख्य पाण्याच्या लाईनवर टॅब मारून लवकरच जोडणार आहेत. या महिन्यात पाणीप्रश्न निकाली काढण्याचा प्रयत्न आहे. तसेच ज्याची पाण्याची वाढीव बिले आली आहेत, त्यांनी ती बिले घेऊन मला समक्ष भेटावे. पलावा येथे नवीन जलवाहिनी जोडणीचे काम अंतिम टप्प्यात आहे. तसेच दिवा आगासन रोडवरील बेडेकर नगर व साईबाबा मंदिरजवळ शेतकऱ्यांकडून जमीन उपलब्ध होत असून काम सुरू होत आहे. लवकरच प्रोजेक्टअंतर्गत नवीन जलवाहिनी चालू होईल.

- रमाकांत मढवी, माजी उपमहापौर, ठाणे

लाखोंची बिले रद्द करून प्रशासनाने योग्य निर्णय घ्यावा. दिवा पश्चिमेच्या इमारतींना पाणी नसणाऱ्या पाईपलाईन काढून नवीन टाकाव्यात. तसेच पाणीप्रश्न निकाली काढावा.

- संजय चौधरी, रहिवासी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com