Bird Census : वसई-विरारमध्ये पक्षिगणनेत २१०० पाणपक्ष्यांच्या नोंदी

आशियायी पक्षी गणनेत एकूण ७५ प्रजाती व दोन हजार १०० पक्ष्यांची नोंद करण्यात आली आहे. मुंबई महानगर क्षेत्रात हा उपक्रम राबवणारी वसई-विरार महापालिका पहिली ठरली आहे.
Bird Census
Bird CensusAgrowon

वसई : वसई-विरार शहरात (Vasai-Virar City) हिरवागार परिसर, निसर्गरम्य ठिकाणांसह विस्तीर्ण समुद्रकिनारा लाभला आहे. यामुळे वसई-विरारमध्ये मोठ्या प्रमाणात विविध प्रकारचे पक्षी आढळतात.

तसेच वसई-विरारलगतच्या कांदळवनाच्या परिसरात मोठ्या संख्येने स्थलांतरित पक्षी दाखल होतात.त्यामुळे वसई-विरार महापालिकेकडून पक्षी गणनेचा (Bird Census) उपक्रम राबवण्यात आला.

यात आशियायी पक्षी गणनेत एकूण ७५ प्रजाती व दोन हजार १०० पक्ष्यांची नोंद करण्यात आली आहे. मुंबई महानगर क्षेत्रात हा उपक्रम राबवणारी वसई-विरार महापालिका पहिली ठरली आहे.

आशियायी पाणपक्षी गणना वसई-विरार महापालिकेकडून राबविण्यात आली. यात पालिकेचे उपायुक्त डॉ. सागर घोलप, बीएनएचएस आणि नेस्ट या दोन पक्षिमित्र संघटनेच्या माध्यमातून नंदकिशोर दुधे व सचिन मेन यांच्यासह इतर पक्षितज्ज्ञांनी या उपक्रमात सहभाग नोंदवला.

Bird Census
Bird Flue : बर्ड फ्लू बाबत जागरुकता महत्वाची

या पक्षी गणणेसाठी वसई-विरार क्षेत्रातील एकूण ३० जागा निश्चित करण्यात आल्या आहेत, त्यापैकी आठ जागांचे निरीक्षण पहिल्या टप्प्यात करण्यात आले. यादरम्यान मिठागर, पाणथळ व मोकळ्या जागेचा आढावा घेतल्यावर विविध प्रजातींचे पक्षी दिसून आले.

या निरीक्षणासाठी महापालिकेने प्रथम पक्षीप्रेमींना ऑनलाईन प्रशिक्षण दिले, त्यानंतर सकाळी ७ ते ८ या वेळेत एक टीम कार्यरत करण्यात आली होती. त्यात ३६ जणांनी सहभाग घेतला होता. सहभाग घेतलेल्या पक्षीप्रेमींना पक्षीजगत पुस्तक तसेच प्रशस्तिपत्रक देऊन गौरविण्यात येणार आहे.

वसई-विरार महापालिका क्षेत्रातील पक्ष्यांबाबत जनमानसांत जागृती घडून यावी व पक्ष्यांचे संरक्षण, संवर्धनात नागरिकांचा सहभाग वाढावा याकरिता आशियाई पाणपक्षी गणणेतून प्रशासनाने पक्षी प्रजातींची नोंद केली. आता यापुढे दोन टप्प्यांत अन्य जागा निश्चित करून पक्षी गणना केली जाणार आहे.
डॉ. सागर घोलप, उपायुक्त, महापालिका

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com