Gram Panchayat Election : अकोला जिल्ह्यात भाजप, ‘वंचित’ची बाजी

अकोला ः जिल्ह्यात मंगळवारी (ता. २०) जाहीर झालेल्या ग्रामपंचायत निकालात भाजप, वंचित बहुजन आघाडीने मोठी बाजी मारली. तुलनेने इतर पक्षांना जिल्ह्यात तितके बळकट स्थान निर्माण करता आले आहे.
Gram Panchayat Election
Gram Panchayat ElectionAgrowon

अकोला ः जिल्ह्यात मंगळवारी (ता. २०) जाहीर झालेल्या ग्रामपंचायत निकालात (Gram Panchayat Result) भाजप, वंचित बहुजन आघाडीने (Vanchit Bahujan Aghadi) मोठी बाजी मारली. तुलनेने इतर पक्षांना जिल्ह्यात तितके बळकट स्थान निर्माण करता आले आहे. दुसरीकडे सर्वच पक्ष आपणच नंबर एकवर असल्याचा दावाही करीत आहेत. जिल्ह्यात २६५ ग्रामपंचायतींमध्ये मतदान (Voting) झाले होते. त्याची मतमोजणी होऊन मंगळवारी दुपारपर्यंत निकाल जाहीर झाले होते. जिल्ह्यात ग्रामीण भागात भाजप, वंचित बहुजन आघाडीतच मोठी चुरस बघायला मिळाली. अनेक ठिकाणी अटीतटीच्या लढती झाल्या.

मूर्तिजापूर तालुक्यात ‘महिला राज’

मूर्तिजापूर तालुक्यातील ५० ग्रामपंचायतींच्या सरपंच व सदस्यपदाच्या निवडणूक निकालात महिलांनी बाजी मारली. युवकांचाही यावेळी भरणा वाढलेला आहे. तालुक्यातील ८६ पैकी या महिन्यात मुदत संपणाऱ्या ५१ ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया पार पडली. उमरी अरबचे रेहाना परवीन अब्दुल सत्तार सरपंच व एकूण १४८ सदस्य बिनविरोध विजयी झाल्यामुळे सरपंचपदाच्या ५० जागांसाठी १९० व सदस्यपदाच्या २३८ जागांसाठी ५३९ उमेदवार रिंगणात होते. मतदारांनी दिलेला कौल संमिश्र असून, काही ठिकाणी अनपेक्षित, तर काही धक्कादायक निकाल हाती आले आहेत.

Gram Panchayat Election
Gram Panchayat Election : कोल्हापूर जिल्ह्यात सत्तांतराचा कौल

अकोट तालुक्यात १७ ग्रामपंचायतीमध्ये ‘वंचित’

अकोट तालुक्यात ३४ ग्रामपंचायतीच्या निकालात मतदारांनी नवख्या चेहऱ्यांना संधी देत प्रस्थापितांना घरी बसवले. तालुक्यात १७ ग्रामपंचायतीत वंचित बहुजन आघाडीने यश मिळविल्याचा दावा केला जात आहे. तालुक्यातील मुंडगाव, कालवाडी, करतवाडी, बेलुरा, लोतखेड, अकोलखेड, अकोली जहागीर, देऊळगाव आदी ग्रामपंचायतींच्या मतमोजणीच्या वेळी समर्थकांमध्ये मोठ्या प्रमाणात चुरस निर्माण झाल्याचे दिसून आले. कालवाडी येथील सरपंच पदाची निवडणूक अटीतटीची झाली. शेवटच्या क्षणी युवा उमेदवार श्‍वेता ऋषिकेश हिंगणकर यांनी प्रतिस्पर्धी उमेदवाराला अवघ्या १८ मतांनी पराभूत केले.

Gram Panchayat Election
Gram Panchayat Election : गावगाड्याचा संदेश

पत्नी सरपंच पदी; पतीचा पराभव

ग्राम बेलुरा येथे सरपंचपदी दीपिका राम मंगळे या विजयी झाल्या असून, वॉर्ड क्रमांक एकमधून सदस्य पदासाठी उभे राहिलेले प्रहार सेवक राम मंगळे यांना मात्र पराभवाचा सामना करावा लागला. तर करतवाडी रेल येथे सरपंचपदाच्या उमेदवार सरला प्रमोद पेटे यांना १६४ मते, तर दुसऱ्या शीतल रूपेश पेटे १६५ मते मिळाली होती. सरला पेटे या एका मताने पराभूत झाल्या होत्या. निवडणूक अधिकाऱ्यांकडे फेर मतमोजणीसाठी अर्ज केल्यानंतर करतवाडी रेल्वे गावची फेरमतमोजणी करण्यात आली. ज्यामध्ये शीतल रूपेश पेटे यांना १६५ मते मिळाल्याचे निष्पन्न झाले.

सर्वांत मोठा पक्षाचा भाजपचा दावा

ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालात अकोला जिल्ह्यात भारतीय जनता पक्ष सर्वांत मोठा पक्ष ठरला असल्याचा दावा करण्यात येत आहे. भारतीय जनता पक्षाचे ग्रामपंचायत निवडणुकीत १०४ ठिकाणी, तर समर्थित असे मिळून १२३ सरपंच, तर ६२७ ग्रामपंचायत सदस्य विजयी झाले आहेत. ग्रामपंचायतींमध्ये तेल्हारा तालुक्यात २३ पैकी १३ ठिकाणी भाजपचे व पाच ठिकाणी भाजप समर्थित उमेदवार विजयी झाले. अकोला तालुक्यात ५४ पैकी २३ ठिकाणी भाजपचे व एका ठिकाणी भाजप सेना युती समर्थित उमेदवार विजयी झाला. पातूर तालुक्यात २८ पैकी नऊ ठिकाणी विजयी झाले. याशिवाय इतर तालुक्यांतही भाजपचे सरपंच विजयी झाले असा दावा पक्षाकडून केल्या जात आहे.

बाळापूर तालुक्यात १८ ग्रामपंचायतींवर ‘वंचित’चे गावपुढारी बाळापूर तालुक्यात २६ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने मुसंडी मारली असून, २६ पैकी १८ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदी ‘वंचित’ने बाजी मारली. तालुक्यात दहा जागांवर भाजपने दावा केला आहे. २६ पैकी १८ ठिकाणी वंचितचे सरपंचपदाचे उमेदवार विजयी झाले. मनारखेड या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवाराला विजय मिळवता आला. फुटीचा मोठा फटका शिवसेनेला बसल्याचे दिसून आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com