Gujarat Election Result : गुजरातेत भाजपच; हिमाचलमध्ये काँग्रेस

विरोधकांनी कितीही टीका आणि प्रयत्न केले तरी, गुजरातमध्ये ‘नरेंद्र मोदी’ हाच एकमेव ब्रँड मतदारांना मान्य असल्याचे गुरुवारी लागलेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालामुळे स्पष्ट झाले.
Gujarat Election
Gujarat ElectionAgrowon

अहमदाबाद/सिमला (वृत्तसंस्था) : विरोधकांनी कितीही टीका आणि प्रयत्न केले तरी, गुजरातमध्ये ‘नरेंद्र मोदी’ (Narendra Modi) हाच एकमेव ब्रँड मतदारांना मान्य असल्याचे गुरुवारी लागलेल्या विधानसभा निवडणुकीच्या (Gujarat Assembly Election) निकालामुळे स्पष्ट झाले. आम आदमी पक्षाच्या (Aam Adami Party) प्रवेशामुळे चुरशीची लढत अपेक्षित असताना भाजपने (BJP) विक्रमी १५७ जागा जिंकत ‘आप’सह काँग्रेसला (Congress) पार धोबीपछाड दिला.

Gujarat Election
Gujarat FRP Pattern : ‘एफआरपी’चा गुजरात पॅटर्न निघाला फुसका

सत्ताधाऱ्यांना नाकारण्याची अनेक वर्षांची परंपरा कायम राखत हिमाचल प्रदेशमधील मतदारांनी भाजपला सत्तेवरून खाली खेचत काँग्रेसकडे सूत्रे सोपविली. दोन्ही राज्यांत प्रथमच निवडणूक लढविणाऱ्या ‘आप’ला कोठेही फारसा प्रभाव पाडता आला नाही. भाजपने गुजरातमध्ये विधानसभेच्या १८२ जागांपैकी १५७ जागांवर विजय मिळविला आहे. या राज्यात आतापर्यंत कोणत्याच पक्षाला इतके भव्य यश आतापर्यंत मिळालेले नाही.

Gujarat Election
Gujarat Election : मोदी-शहांच्या प्रतिष्ठेचा सामना

सलग २७ वर्षे राज्यात असतानाही भाजपला असे यश मिळणे, हा सर्व पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लोकप्रियतेचा परिणाम असल्याचे दिसून आले आहे. २०१७ च्या निवडणुकीपेक्षाही यंदा ५८ जागा भाजपला अधिक मिळाल्या आहेत. भाजपला पराभूत करण्याचा विश्‍वास व्यक्त करणाऱ्या आम आदमी पक्षाला दोन अंकी संख्याही गाठता आली नाही. राज्यातील काँग्रेसचे बळ आणखी कमी झाले आहे. आम आदमी पक्षामुळे काँग्रेसच्या मतांची विभागणी झाल्यानेच भाजपला मोठा विजय मिळाला, असे निकालानंतर दिसून येत आहे.

मतदारांनी भाजपवर मोठा विश्‍वास ठेवल्याने त्यांच्या विश्‍वासाला पात्र ठरण्याची आमच्यावर मोठी जबाबदारी आहे, असे म्हणत मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी जनतेचे आभार मानले. पटेल हेदेखील घाटलोडिया मतदार संघातून सहज विजयी झाले आहेत. पटेल यांच्याचकडे राज्याचे नेतृत्व असेल, असे भाजपने आधीच जाहीर केले आहे. काँग्रेसच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत गुजरातचे प्रभारी आमदार डॉ. रघू शर्मा यांनी राजीनामा दिला.

हिमाचल प्रदेशमध्ये भाजपने सत्ता गमावली असून ‘रिवाज’ बदलण्याचे भाजपने केलेले आवाहनही मतदारांनी धुडकावून लावले आहे. या छोट्या राज्यातील पराभवामागे पक्षातील बंडखोरी हेच प्रमुख कारण असल्याचे भाजपच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. ६८ जागांच्या विधानसभेत बहुमतासाठी ३५ चा आकडा पार करावा लागणार होता. पण, काँग्रेसने स्पष्ट बहुमत मिळवले असून भाजपला २६ जागांवर समाधान मानावे लागले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com