
Sangli News सांगली बाजार समितीच्या निवडणुकीचे (APMC Election) चित्र गुरुवारी (ता. २०) स्पष्ट झाले. राजकीयदृष्ट्या संवेदनशील मानल्या जाणाऱ्या सांगली बाजार समितीची निवडणूक महाविकास आघाडी विरुद्ध भाजप यांच्या पॅनेलमध्ये होत आहे.
महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाचा वाद अर्ज माघारीपर्यंत सुरूच राहिला. इच्छुकांना अर्ज माघारीसाठी नेत्यांना मनधरणी करावी लागली.
निवडणुकीतील ५१० उमेदवारांपैकी ४२० जणांनी माघार घेतली. १८ जागांसाठी ९० उमेदवार मैदानात आहेत. आघाडीतील नाराजांवर भाजपच्या पॅनेलकडून निमंत्रण दिले जात आहे. यंदाच्या निवडणुकीत इच्छुक उमेदवारांची संख्या वाढल्याने चुरस निर्माण झाली होती.
अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी चित्र स्पष्ट झाले. १८ जागांसाठी ५९० उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. त्यात छाननीनंतर ५१० अर्ज शिल्लक राहिले. अर्ज माघारीच्या काळात ४२० जणांनी माघार घेतली, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी व जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांनी दिली.
बाजार समितीसाठी गेले काही दिवस महाविकास आघाडी व भाजपमध्ये लढतीची राजकीय क्षेत्रात जोरदार चर्चा होती; परंतु ‘मविआ’ तसेच भाजप यांच्यातील लढतीचे चित्र गुरुवारी (ता. २०) दुपारी स्पष्ट झाले.
‘मविआ’ने आपले वसंतदादा शेतकरी महाविकास आघाडी हे पॅनेल जाहीर केले. पक्षनिहाय काँग्रेसने ७, राष्ट्रवादी ६, माजी मंत्री घोरपडे गटाला दोन जागाचे वाटप झाले आहे.
इस्लामपूरमध्ये १८ सदस्यांसाठी ३६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. भाजप व सर्वपक्षीय आणि राष्ट्रवादी व शेतकरी परिवर्तन पॅनेल यांच्यात लढत होणार आहे.
पलूसची निवडणूक अपेक्षेप्रमाणे अंतिम क्षणी बिनविरोध झाली. एकूण जागांपैकी सत्ताधारी काँग्रेसला १०, भाजप व राष्ट्रवादीला प्रत्येकी ३ तर स्वाभिमानी विकास आघाडीला प्रत्येकी एक जागा देण्यात आली. काँग्रेसचे वर्चस्व कायम राहिले आहे.
शिराळा समितीत शेवटच्या दिवशी ४० अर्ज माघारी घेण्यात आले. त्यामुळे १८ जागांसाठी १८ उमेदवारी अर्ज राहिल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली. राष्ट्रवादीचे १४ व भाजपचे ४ संचालक निवडून आले.
आटपाडीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप एकत्रित मैदानात उतरली आहे. तर काँग्रेस, शिंदे गटाची शिवसेना आणि रासपने एकत्र आले आहेत. खानापुरात १७ जांगासाठी ३४ उमेदवार रिंगणात, एक जागा बिनविरोध.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.