भाजपच्या पदाधिकाऱ्यांना बाजार समित्यांचे वेध

सध्या बाजार समित्यांमध्ये प्रशासक म्हणून नेमलेल्या तत्कालीन महाविकास आघाडी (Mahavikas Aaghadi) समर्थकांना बाजूला सारून नवीन प्रशासक राज येईल, अशी चर्चा सुरु झाली आहे.
APMC
APMCAgrowon

अकोला ः राज्यात नुकतेच सत्ता परिवर्तन झाल्यानंतर जुन्या सरकारचा एक-एक निर्णय बदलला जाऊ लागला आहे. अशाच तऱ्हेने सध्या बाजार समित्यांमध्ये प्रशासक म्हणून नेमलेल्या तत्कालीन महाविकास आघाडी (Mahavikas Aaghadi) समर्थकांना बाजूला सारून नवीन प्रशासक राज येईल, अशी चर्चा सुरु झाली आहे.

गेल्या वर्षी मे महिन्याअखेरपर्यंत मुदत संपलेल्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये (APMC) निवडणूक न झाल्याने तत्कालीन महाविकास आघाडी शासनाने प्रशासक मंडळ नेमले होते.

कुठे शिवसेना (Shivsena), कुठे काँग्रेस (Congress), कुठे राष्ट्रवादीचे (NCP)पदाधिकारी या पदांवर नेमण्यात आले होते. अद्यापही या बाजार समित्यांमध्ये निवडणुका झालेल्या नाहीत. यामुळे शिल्लक असलेल्या काळात आताच्या सरकारकडून नवीन प्रशासक नेमले जाण्याची अधिक शक्यता आहे.

अनेक बाजार समित्यांमध्ये महाविकास आघाडीतील पक्षांमध्ये काम करणारे पदाधिकारी प्रशासक म्हणून बाजार समित्यांवर गेलेले आहेत. त्यांनी कामकाज सांभाळत धडाडीचे निर्णयही घेतले. परंतु नवे सरकार आल्याने आताचे हे प्रशासकाचे पद किती दिवस राहील, याची चिंता त्यांना वाटू लागली आहे. प्रशासकराज कायम राहण्यास नवीन सरकारचे समर्थक पदांवर नेमले जातील किंवा निवडणुका लागल्या तर ती तयारी असल्याचेही बोलले जात आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com