Andheri By-Election : अंधेरी पोटनिवडणुकीत भाजपची माघार

लटकेंचा बिनविरोधचा मार्ग मोकळा; मुरजी पटेल यांचा अर्ज मागे
Andheri Election
Andheri ElectionAgrowon

मुंबई : अंधेरी पोटनिवडणुकीतून भाजपने (BJP Election Withdrawal Andheri) माघार घेत शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांचा बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा केला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी नागपुरात भाजपचे उमेदवार मुरजी पटेल (Murji Patel) माघार घेत असल्याचे जाहीर केले.

Andheri Election
Crop Loan : पहिल्या टप्प्यात ३७ हजार शेतकऱ्यांची कर्जमुक्ती

अंधेरी पूर्व मतदारसंघाचे आमदार रमेश लटके यांचे निधन झाल्याने रिक्त जागेवर पोटनिवडणूक लागली होती. यासाठी शिवसेनेने लटके यांच्या पत्नी ऋतुजा यांना उमेदवारी दिली होती. तर भाजपने मागील वेळी अपक्ष लढलेल्या मुरजी पटेल यांना उमेदवारी दिली होती. पटेल यांचा अर्ज भरण्यासाठी भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, आमदार नितेश राणे यांच्यासह शिंदे गटाचे प्रवक्ते आणि शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्यासह अनेक बडे नेते उपस्थित होते.

Andheri Election
Cotton Crop Damage : आठवडाभर झालेल्या पावसाने भिजलेला कापूस काळवंडला

तर लटके यांचा अर्ज भरण्यासाठी आदित्य ठाकरे यांच्यासह राष्ट्रवादीचे दिलीप वळसे पाटील आणि अन्य बडे नेते उपस्थित होते. अर्ज छानणीवेळी शिवसेनेने पटेल यांच्या अर्जावर आक्षेप घेतला होता तरीही त्यांचा अर्ज कायम ठेवला. मात्र, पटेल यांना महापालिकेने जातप्रमाणपत्रप्रकरणी सहा वर्षे निवडणूक लढविण्यास बंदी घातली होती, ही बाब केंद्रीय निवडणूक आयोगाला कळविण्याची तयारी केली होती. त्यामुळे पटेल यांच्या उमेदवारीबाबत साशंकता व्यक्त केली जात होती.

दरम्यान मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून रमेश लटके हे चांगले कार्यकर्ते होते. त्यांच्या मृत्यूनंतर पत्नी निवडणूक लढवीत असेल तर तेथे भाजपने उमेदवार देऊ नये. पटेल यांनी माघार घ्यावी, असे आवाहन केले. तसेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, शिंदे गटाचे प्रताप सरनाईक यांनीही उमेदवारी मागे घेण्याचे आवाहन केले होते.

दरम्यान रविवारपासून भाजपमध्ये बैठकांचे सत्र सुरू होते. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपुरात पत्रकार परिषद घेत मुरजी पटेल माघार घेत असल्याचे जाहीर केले. तसेच ते अपक्षही लढणार नाहीत असे सांगितले.

‘राज यांचे पत्र म्हणजे भाजपची स्क्रीप्ट’

अंधेरी पोटनिवडणुकीत आम्ही ४५ हजारांपेक्षा जास्त मतांनी जिंकणारच होतो, असा भाजपचा सर्व्हे होता. तरीही ज्या संस्कृतीच्या गप्पा मारल्या जातात हे मागे लपण्यासारखे आहे, असा पलटवार शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केला. तसेच राज ठाकरे यांनी लिहिलेले पत्र म्हणजे भाजपची स्क्रीप्ट आहे. भाजपने पूर्ण अभ्यास करूनच अर्ज माघार घेतला आहे, असेही राऊत म्हणाले. राऊत यांच्या जामिनासाठी सुनावणीला न्यायालयात आणले असता प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते.

राज ठाकरे यांच्याविरोधात घोषणाबाजी

अर्ज माघारीची घोषणा केल्यानंतर मुरजी पटेल यांच्या कार्यकर्त्यांनी राज ठाकरे मुर्दाबाद अशी घोषणाबाजी केली. काही कार्यकर्ते रडतही होते.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com