
देशाचे लक्ष लागलेल्या गुजरात विधानसभा (Gujrat Election 2022 Live Update) निवडणुकीत भाजपने (BJP Won Election) अभूतपूर्व आघाडी मिळवली आहे. संध्याकाळी ६ पर्यंत मतमोजणी सुरू होती. त्यानुसार गुजरातमध्ये १४२ जागेवर भाजपने विजय मिळवला. तर १४ जागांवर भाजप आघाडीवर होते. मात्र भाजपने सत्तास्थापनेसाठीचा बहुमताचा आकडा गाठला. त्यामुळे १२ डिसेंबर रोजी भाजपचे भूपेंद्र पटेल मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील, अशी माहिती भाजपचे सीआर पाटील यांनी दिली.
या निवडणुकीत कॉँग्रेसने संध्याकाळी ६ वाजेपर्यंत केवळ १६ जागेवर विजय मिळवला. तर १ जागेवर आघाडी घेतली होती. तसेच आम आदमी पक्षाने ५ जागांवर विजय मिळवत दिमाखात राष्ट्रीय पक्ष होण्याकडे वाटचाल केली आहे.
भाजपने या निवडणुकीत संध्याकाळी ६ पर्यंत ५२.५ टक्के मत मिळवली. त्यापाठोपाठ २७.३ टक्के मत कॉँग्रेस आणि १२.९ टक्के मत आप पक्षाने मिळवले. या विजयानंतर भाजपने गुजरातमध्ये वर्चस्व सिद्ध केले. गुजरातमध्ये मागील २५ वर्षापासून भाजपाची सत्ता आहे. पंजाब आणि दिल्लीत सत्ता स्थापन करणाऱ्या आपने या निवडणुकीत उडी मारली. त्यामुळे पारंपारिक प्रतिस्पर्धी भाजप आणि कॉँग्रेसमध्ये मतांची होणारी विभागणी भाजपच्या पथ्यावर पडली. २०१७ मध्ये कॉँग्रेसने भाजपला ९९ जागेवर रोखले होते. मात्र यावेळीचे चित्र उलट ठरले. या निवडणुकीनंतर भाजपच्या नेत्यांनी आनंद व्यक्त केला.
हिमाचलमध्ये कॉँग्रेसचा डंका
हिमाचल प्रदेशमध्ये भाजप आणि कॉँग्रेसमधील लढत चुरशीची झाली. संध्याकाळी ६ वाजेपर्यंत कॉँग्रेसने बाजी मारत ४० जागांवर विजय मिळवला. तर भाजपला २३ जागांवर विजय मिळवला. सत्ता स्थापन करण्यासाठी ३५ चा आकडा गाठत कॉँग्रेसने बहुमत मिळवले आहे. सकाळी चुरशीची ठरलेली लढत दुपारनंतर मात्र कॉँग्रेसच्या बाजूने झुकली गेली. या निवडणुकीत ४३.९ टक्के मत कॉँग्रेसला मिळाली तर ४३ टक्के मतं भाजपने मिळवली. तर १०.४ टक्के मतं इतरांना मिळवली.
दरम्यान प्रत्येक पाच वर्षांनंतर हिमाचलमध्ये सत्ताबदल होते. त्याप्रमाणे भाजप आणि कॉँग्रेसमध्ये आतापर्यंत ५-५ वर्षे हिमाचलमध्ये सत्ता स्थापन केलेली आहे. हिमाचलमध्ये परत एकदा सत्तांतर पाहिला मिळालं आहे.