सहकार मोडीत काढण्याचा भाजपचा प्रयत्न: भुजबळ

भुजबळ म्हणाले, सहकारी संस्था टिकविण्यासाठी चांगले प्रतिनिधी (Representatives) निवडून देण्याची आवश्यकता आहे. अनेक संस्थांवर संचालक मंडळाने या संस्था ओरबाडून खाल्या आहेत.
Chhagan Bhujbal
Chhagan BhujbalAgrowon

नाशिक : बाजार समित्यांमध्ये सोसायटी संचालकांऐवजी सर्व शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार योग्य आहे. मात्र, या बाजार समित्यांना निवडणूक खर्चामुळे निवडणुका घेणे कठीण होणार असून खर्चामुळे या संस्था मोडकळीस निघतील. या संस्थाकडे पुरेसा निधी नाही. सहकारी संस्थांवर यांचे सदस्य नसल्याने गेल्या सरकारमध्ये देखील त्यांनी बाजार समित्यांवर आपले प्रतिनिधी मागच्या दाराने आत पाठविले होते. त्यांना आपले लोकप्रतिनिधी वाढवायचे असेल तर त्यांनी निवडणूक प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे सांगत भाजपकडून (BJP) सहकार चळवळ मोडकळीस काढली जात असल्याची टीका माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केली.

लासलगाव येथील स्वामी लॉन्स येथे शनिवारी (ता. १६) नवनिर्वाचित विविध सहकारी सोसायटी संचालकांचा जाहीर सत्कार व शेतकरी मेळावा छगन भुजबळ यांच्या उपस्थित पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षिरसागर, मुंबई बाजार समितीचे संचालक जयदत्त होळकर, येवला विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, गुणवंत होळकर आदींसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

भुजबळ म्हणाले, सहकारी संस्था टिकविण्यासाठी चांगले प्रतिनिधी निवडून देण्याची आवश्यकता आहे. अनेक संस्थांवर संचालक मंडळाने या संस्था ओरबाडून खाल्या आहेत. त्यामुळे काही सहकारी संस्था अडचणीत आलेल्या आहे. नाशिक जिल्हा बँकेत देखील असाच प्रकार झाल्याची टीका त्यांनी केली.

शेतकरी सावकारी पाशातून मुक्त

शेतकऱ्यांना सावकारी पाशातून मुक्त करण्याचे काम सहकारी सोसायट्यांनी केले आहे. सहकारी सोसायट्या या केवळ कर्जपुरवठा करण्यापुरत्या मर्यादित राहू नये. त्यांनी आपल्या कार्यकक्षा अधिक वृद्धिंगत करण्यात याव्यात. राज्यातील अनेक सहकारी संस्थांनी वेगवेगळे उद्योग सुरू केले आहे. त्यांचा आदर्श सर्व सोसायट्यांनी घ्यावा, असे आवाहन करत आमचा सहकार आम्ही मोडीत निघू देणार नाही तर वेळप्रसंगी तुमचं सरकार मोडीत काढू, असे त्यांनी सांगितले.

तसेच येणाऱ्या काळात महाविकास आघाडी यापुढेही निवडणुकींचा एकत्रित सामोरे जाईल. यासाठी सर्वांनी एकत्र येऊन संघटन अधिक मजबूत करावे आणि महाविकास आघाडी सरकारचे उमेदवार निवडून द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. केंद्र सरकारने अनेक शब्दांना असंसदीय ठरविले आहे. लोकप्रतिनिधींना बोलण्यासाठी अडथळे निर्माण करून आवाज दाबण्याचा प्रकार सुरू असल्याची टीका त्यांनी केली.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com