गंगापूर-वैजापूर महामार्गावर शेतकऱ्यांचा रास्ता रोको

गंगापूर-वैजापूर महामार्गावर मांजरी फाट्यावर राष्ट्रवादीचे नेते वाल्मीक शिरसाठ यांच्या नेतृत्वात शेकडो शेतकऱ्यांनी रास्तारोको आंदोलन केले.
Farmer Protest
Farmer ProtestAgrowon

गंगापूर, जि. औरंगाबाद : ‘मी शेतकरी मी आंदोलक, कांद्याला भाव (Onion Rate) मिळालाच पाहिजे, रस्त्यावरचे खड्डे तत्काळ भरा नाही तर खुर्ची खाली करा’, शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये अनुदान मिळालेच पाहिजे’ अशा घोषणा देत शनिवारी (ता. २०) येथील गंगापूर-वैजापूर महामार्गावर मांजरी फाट्यावर राष्ट्रवादीचे नेते वाल्मीक शिरसाठ यांच्या नेतृत्वात शेकडो शेतकऱ्यांनी रास्तारोको आंदोलन (Farmer Protest) केले.

Farmer Protest
Kharif Sowing : पुणे विभागात १०३ टक्के पेरणी

तब्बल एक तास सुरू असलेल्या आंदोलनामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. या आंदोलनात शिवसेनेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, उपजिल्हाप्रमुख कृष्णा पाटील डोणगावकर, माजी आमदार अण्णासाहेब माने, खरेदी-विक्री संघाचे माजी सभापती सुभाष धोत्रे यांनी भेट देऊन पाठिंबा दर्शविला. तहसीलदार सतीश सोनी, कृषी अधिकारी ज्ञानेश्वर तारगे यांनी निवेदन स्वीकारून शासन दरबारी लवकरात लवकर पाठपुरावा करण्याची ग्वाही दिली.

Farmer Protest
Crop Insurance : २५ हजार बागायतदारांना २७ कोटींचा विमा परतावा मंजूर

कृष्णा पाटील डोणगावकर, माजी आमदार अण्णासाहेब माने, सुभाष धोत्रे यांनी मनोगत व्यक्त केले. आंदोलनात अनंता भडके, ऋषिकेश मनाळ, शरद कोळसे, कृष्णा कारभार, अशोक वालतुरे, चंद्रकांत जाधव, अरुण ठोकळ, काकासाहेब जाधव, गोविंद जाधव, अशोक साळुंके, बापूसाहेब साळुंखे, सत्यजित क्षीरसागर, अनिल शिंदे, अनिल भागवत, विठ्ठल मिसाळ, जोसेफ माघाडे, सोमीनाथ शिंदे, गणेश वाघ, अनिल म्हस्के, योगेश म्हस्के, पोपट म्हस्के, अरुण शेळके, सादेक शेख, संजय रोकडे, भगवान सोनवणे, भागिनाथ मोरे, महेश कोतकर, नानाभाऊ लांडे, सुवर्णा जाधव, वैजयंती शिरसाठ, संगीता वाघ, अंजली शिरसाठ, लीलाबाई बर्डे आदींसह महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. दरम्यान, आंदोलनावेळी रुग्णवाहिका व सीईटी परीक्षेसाठी जाणाऱ्या वाहनांना आंदोलकांनी जागा मोकळी दिली.

शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या

- शेतकऱ्यांना सरसकट हेक्‍टरी ५० हजार रुपयांचे अनुदान

- नेवरगाव गटातील रस्त्यांची दुरुस्ती

- नांदूर मधमेश्वर कालव्याच्या जमिनीचा मोबदला देण्यात यावा.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com