
नागपूर ः संत्रा हे विदर्भाचे मुख्य फळपीक (Fruit Crop) त्यामुळेच नागपूरला ऑरेंजसिटी (Orange City) अशी ओळख मिळाली आहे. मात्र जी-२० गटाच्या परिषदेची (G-20 Conference) बैठक नागपुरात होत असताना ही ओळख पुसत टायगर कॅपिटल ऑफ इंडिया (Tiger Capital Of India) असे नागपूरचे ब्रॅण्डिंग केले जाणार असल्याने संत्रा बागायतदारांमध्ये असंतोष व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे या संदर्भातील नियोजन पर्यटन विकास महामंडळाकडे सोपविण्यात आले आहे.
भारतासह १९ देश आणि युरोपीय महासंघाचा समावेश असलेल्या जी-२० परिषदेचे यजमानपद यंदा भारताला मिळाले आहे. त्यातील एक बैठक देशाचे मध्य असलेल्या नागपुरात मार्च २०२३ मध्ये प्रस्तावित आहे. हे विदर्भासाठी मोठे भूषणावह ठरले आहे. मात्र याच बैठकीच्या निमित्ताने विदर्भाची ओळख असलेल्या संत्र्याऐवजी वाघांचे ब्रॅण्डिंग करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे.
त्या संदर्भातील सूचनादेखील पर्यटन विकास महामंडळाला देण्यात आल्या आहेत. दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राकडून यावर अपेक्षित काम करण्याचे नियोजन सुरू आहे. या साऱ्या घडामोडी घडत असताना याबद्दल नागपुरी संत्रा उत्पादकांनी नाराजी व्यक्त केली आहे. २०२२ या वर्षातील जनगणनेनुसार राज्यात ३१२ वाघ आहेत. यातील २०० वाघ एकट्या विदर्भात आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.
नागपुरी संत्र्याला जागतिक ओळख मिळवून देण्याची ही नामी संधी आहे. या संधीचा उपयोग नागपुरी संत्र्याचा ब्रॅण्डिंगसाठी केल्यास उत्पादकांना येत्या काळात त्याचा फायदा होईल. त्याकरिता गिफ्ट म्हणून जी-२० सदस्यांना नागपुरी संत्रा फळे दिली पाहिजेत. या टेबल फ्रूटची चव आवडल्यास संबंधित देशात निर्यात वाढेल. मार्च २०२३ मध्ये ही बैठक होणार आहे. त्या वेळी मृग बहरातील संत्रा फळे राहतात.
- श्रीधर ठाकरे, कार्यकारी संचालक, महाऑरेंज
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.