Amravati Bribe News : नाहरकत प्रमाणपत्रासाठी सरपंचाने स्वीकारली लाच

ग्रामपंचायतीच्या माध्यमातून देण्यात येणारे नाहरकत प्रमाणपत्र देखील भ्रष्टाचाराचे कुरण झाले आहे.
Bribe
Bribe Agrowon

Amaravati Bribe Arrest अमरावती : ग्रामपंचायतीच्या माध्यमातून देण्यात येणारे नाहरकत प्रमाणपत्र देखील भ्रष्टाचाराचे कुरण झाले आहे.

असाच एक प्रकार चांदूर बाजार तालुक्‍यातील कारंजा बहिरम गावात उघडकीस आला आहे.

नाहरकत प्रमाणपत्रासाठी एक हजार रुपयांची लाच घेताना सरपंचाला ‘एसीबी’ने रंगेहात पकडले.

Bribe
Bribe : लाचखोर महिला तलाठीस तीन वर्षे सश्रम कारावास

रमेश गणेश मोहोड ( रा. कारंजा बहिरट), असे ‘एसीबी’च्या जाळ्यात अडकलेल्या सरपंचाचे नाव आहे. बुधवारी (ता. १) सायंकाळी चारनंतर बहिरट येथील कारंजा नाका परिसरात अमरावतीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने हा सापळा रचला.

Bribe
Bribe : एक लाखाची लाच मागणाऱ्या ग्रामविकास अधिकाऱ्याला अटक

समर्थ फाउंडेशनचे संचालकांनी संस्थेमार्फत यात्रेत लावणीनृत्य स्पर्धेच्या कार्यक्रमासाठी ग्रामपंचायत कारंजा बहीरम यांच्याकडे परवानगी मागितली होती. नाहरकत प्रमाणपत्रासाठी सरपंच मोहोड यांनी या संचालकांकडे १ हजार रुपयांची लाच मागितली होती.

पैसे देण्यापूर्वी संबंधित संचालकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. त्यानुसार ‘एसीबी’ने हा सापळा रचला. सरपंच मोहोड यांनी पैसे स्वीकारताच त्यांना अटक झाली.

पोलिस निरीक्षक अमोल कडू, योगेशकुमार दंदे, माधुरी साबळे, विनोद कुंजाम, शैलेश कडू, सतीश किटुकले यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com