Indian Culture : नववधू-वराची सजविलेल्या बैलगाडीतून घराकडे स्वारी

Wedding Culture : पूर्वी ग्रामीण संस्कृतीला अनुसरून वऱ्हाड आणि वर बैलगाडीतून लग्नाघरी यायचे. तर नवरी नवरदेवासोबत याच सजवलेल्या बैलगाडीतून सासरी जायची.
Nashik News
Nashik News Agrowon

Nashik News : पूर्वी ग्रामीण संस्कृतीला अनुसरून वऱ्हाड आणि वर बैलगाडीतून लग्नाघरी यायचे. तर नवरी नवरदेवासोबत याच सजवलेल्या बैलगाडीतून सासरी जायची. मात्र अलीकडे लग्न समारंभारात सजवलेल्या चारचाकी आलिशान गाड्यांची क्रेझ वाढत आहे.

मात्र असे असताना नाशिक येथे नववधू आणि नवरदेवाची स्वारी सजविलेल्या बैलगाडीतून (Bullock Cart) घरी आली. अशा अनोख्या पद्धतीने भदाणे व लोणे परिवाराने कृषी संस्कृती (Agriculture Culture) जपण्याचा संदेश दिला.

Nashik News
Nashik APMC News : निवडणुकीच्या तोंडावर माजी सभापती विरुद्ध पकड वॉरंट

फुलांनी सजवलेली बैलगाडी, अंगावर बैलांच्या रंगीत झुल, आकर्षक शिंगांतील शेंब्या आणि मोरपिसे असा बैलजोडीचा रुबाब होता. वर रोहन भदाणे याने नववधू पूजा हिला चक्क सजवलेल्या बैलगाडीतून लग्नमंडपातून बिदाई झाल्यानंतर घरी नेले. जुन्या रूढी-परंपरेला उजाळा देत हा लग्न सोहळा नुकताच थाटात पार पडला.

Nashik News
Nashik Hailstorm News : नाशिकला वादळी पावसासह गारपिटीने पुन्हा हाहाकार

अलीकडे नववधूला कोणी बुलेटवरुन, ट्रॅक्टरवरून, तर अगदी हेलिकॉप्टरमधूनही लग्न मंडपातून आपल्या घरापर्यंत घेऊन गेल्याची उदाहरणे आहेत.

समाजामध्ये अलीकडे महागड्या गाड्यांचा वापर करून सजावटीवर वारेमाप खर्च केला जातो.

मात्र सध्य परिस्थितीत वाढलेले इंधन दर व होणारा अतिरिक्त खर्च कमी करून एक सामाजिक संदेश म्हणून आपल्या कृषी संस्कृतीस अनुसरून बैलगाडीवर वरात काढण्याचा निर्णय भदाणे परिवाराने घेतला.

सामाजिक प्रतिष्ठा बाजूला ठेऊन कृषी संस्कृतीचा आदर्श समोर ठेवून ही कृती करण्यात आली. त्यामुळे या विषयाच्या चर्चेसह भदाणे परिवाराचे कौतुकही झाले.

जुन्या आठवणींना उजाळा

लग्न सोहळ्यात पारंपरिक पद्धतीसह जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. त्यानंतर सर्व ज्येष्ठ वऱ्हाडी मंडळींमध्ये स्वतःच्या लग्नाला किती बैलगाड्या होत्या. पारंपरिक पद्धतीने कसे पाच दिवस लग्नकार्यासाठी लागत.

माणसाकडे पैसा कमी होता, पण समाधान होते. याची चर्चा लग्नमंडपात रंगली होती. नवीन जोडप्यांचा ग्रामीण आणि कृषी संस्कृतीकडे कल वाढत असल्याचे आशादायी चित्र या वेळी पाहायला मिळाले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com