Atal Bhujal Scheme : ‘अटल भूजल’ योजनेतून गावे पाणीदार करा

अटल भूजल’ योजनेसाठी सरपंच, उपसरपंच, सदस्यांचा सक्रिय लोकसहभाग महत्त्वाचा आहे. या लोकसहभागातून आपली गावे पाणीदार करावी, असे आवाहन खासदार संजय पाटील यांनी केले.
Water Conservation Scheme
Water Conservation SchemeAgrowon

सांगली ः ‘अटल भूजल’ योजनेसाठी (Atal Bhujal Scheme) सरपंच, उपसरपंच, सदस्यांचा सक्रिय लोकसहभाग महत्त्वाचा आहे. या लोकसहभागातून आपली गावे पाणीदार करावी, असे आवाहन खासदार संजय पाटील यांनी केले.

केंद्र शासन व जागतिक बँक पुरस्कृत ‘अटल भूजल’ योजनेअंतर्गत जत तालुक्यातील डफळापूर येथे गावस्तरीय प्रशिक्षणाचे उद्‍घाटन झाले. तालुक्यातील योजनेत समाविष्ट २१ गावांचे सरपंच, उपसरपंच व ग्रामसेवक यांचे चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते.

Water Conservation Scheme
Atal Bhujal Scheme : दीड लाख नागरिकांमध्ये होणार ‘अटल भूजल’ची जनजागृती

त्या वेळी खासदार संजय पाटील बोलत होते. या वेळी भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा सांगलीचे वरिष्ठ भूवैज्ञानिक ऋषिराज गोसकी, डफळापूर गावचे सरपंच सुभाषराव गायकवाड, पंचायत समिती सदस्य दिग्विजय चव्हाण, जतचे उपविभागीय अधिकारी जोगेंद्र कट्यारे, तहसीलदार जीवन बनसोडे, जतचे गटविकास अधिकारी दिनकर खरात, तालुका कृषी अधिकारी हणमंत मेडिदार, कनिष्ठ भूवैज्ञानिक अमित जिरंगे उपस्थित होते.

Water Conservation Scheme
Atal Bhujal : ‘अटल भूजल’अंतर्गत ग्रामपंचायतस्तरीय क्षमता बांधणी कार्यक्रमास प्रारंभ

खासदार पाटील म्हणाले, की जत तालुक्याला म्हैसाळ योजनेतूनही पाणी मिळणार आहे. पाण्याबदल जागरूकता करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. जास्त पाणी लागणाऱ्या पिकाऐवजी पर्याय म्हणून कमी पाणी लागणारी पिके घेण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा.

वरिष्ठ भूवैज्ञानिक ऋषिराज गोसकी यांनी सरपंच, उपसरपंच व ग्रामसेवक यांना ‘अटल भूजल’ योजनेची सर्वसाधारण माहिती, रचना जलसुरक्षा आराखड्याची प्रक्रियेची माहिती दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com