Kolhapur Update - कोल्हापुरात म्हशींची भरते सौंदर्य स्पर्धा !

कोल्हापूरमध्ये दरवर्षी दिवाळी पाडव्यानिमित्त म्हशींची सौंदर्य स्पर्धा पंचगंगा नदीकिनारी भरवली जाते. पशुपालक पाडव्यानिमित्त म्हशीबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात.
Kolhapur Update
Kolhapur UpdateAgrowon

कोल्हापूरमध्ये (Kolhapur Padwa) दरवर्षी दिवाळी पाडव्यानिमित्त म्हशींची सौंदर्य स्पर्धा पंचगंगा नदीकिनारी भरवली जाते. पशुपालक पाडव्यानिमित्त म्हशीबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात. म्हशींचा एक दिवस गुणगौरव या धर्तीवर महानगरपालिका व म्हैसधारक संघटना कोल्हापूर (Kolhapur Municipal Corporation) यांच्यावतीने कार्यक्रम आयोजित केला जातो.

Kolhapur Update
Indian Agriculture : शेतकऱ्यांप्रती असंवेदनशील कर्मचाऱ्यांचे कापणार वेतन

पशुपालक त्यांच्या म्हशीला वेगवेगळ्या प्रकारची सजावट करतात. गळ्यामध्ये, पायांना, शिंगांना गोंडे लावतात. तसेच त्यांना विविध रंगांनी रंगवले जाते. आणि म्हशींची मिरवणूक काढली जाते. अतिशय सुंदर प्रकारे सजवलेल्या आणि आकर्षक म्हशींचा गुण गौरव म्हणून पशुपालकांना बक्षीस दिले जाते.

या स्पर्धेविषयी कोल्हापूर जुना बुधवार पेठ येथील पशुपालक संदीप पाटील सांगतात, "आमच्याकडे आगास, मैना, हिरा, टिक्का, सरदार नावाच्या चार म्हैशी आहेत. आम्ही वर्षभर त्यांचे पालन करतो. आमची एक म्हैस जवळपास आठ ते बारा लिटरपर्यंत दूध देते. तसेच या कार्यक्रमासाठी आम्ही वर्षभर तयारी करतो. म्हशींना गाडी पाठीमागून चालत येण्याचे प्रशिक्षण दिले जाते. तसेच मालकाच्या एका हाकेने किंवा शिट्टी वाजवल्याने म्हैस कुठूनही धावत आपल्या मालकाजवळ येऊन उभी राहते. दरवर्षीप्रमाणे यंदाही कार्यक्रम दिवाळी पाडव्यानिमित्त कोल्हापुरात पूर्ण उत्साहामध्ये पार पडला.

कायदे रद्द केल्याशिवाय शेतमालाची बाजारपेठ खुली होणार नाही. वस्तु व सेवा कायद्यामुळे केंद्र व राज्य सरकारांच्या अप्रत्यक्ष करांचं एकत्रीकरण करण्यात आलं. याच धर्तीवर शेतमालाच्या बाजारपेठेबाबतच्या धोरणाला कायद्याच्या चौकटीत बसवण्याचे प्रयत्न पुढच्या दहा वर्षांत होण्याची शक्यता आहे.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com