Wheat, Rice Buffer Stock : गहू, तांदळाचा बफर स्टाॅक घटला

सरकारकडे गहू आणि तांदळाचा बफर स्टाॅक गेल्यावर्षीपेक्षा कमी आहे.
Wheat And Rice
Wheat And RiceAgrowon

पुणे : सध्या बाजारात गहू (Wheat) आणि तांदळाचे दर (Rice Rate) वाढलेले आहेत. सरकारकडे गहू आणि तांदळाचा बफर स्टाॅक (Buffer Stock) गेल्यावर्षीपेक्षा कमी आहे. त्यातच गव्हाचं प्रमाण कमी आहे. त्यामुळे दिवाळीपासून गव्हाचे दर वाढलेले दिसत आहेत.

सरकारकडे सध्या गहू आणि तांदळाचा साठा गेल्यावर्षीपेक्षा कमी आहे. गेल्या रब्बी हंगामात (Rabi Season) उष्णतेमुळे गहू उत्पादनात (Wheat Production) घट झाली. त्यामुळे सरकारची खरेदीही घटली. तर चालू खरिपात भाताची लागवड कमी झाली. देशातील महत्वाच्या भात उत्पादक पट्ट्यात वेळेवर पाऊस झाला नाही. तर काही भागात कमी पाऊस झाला. त्यामुळे लागवड घटली. त्याचा परिणाम उत्पादनावर झालाे. त्यामुळे चिंता आणखी वाढली.

Wheat And Rice
Rabi Season : आता भिस्त रब्बीवर...

सरकारकडे १५ ऑक्टोबरपर्यंत २२२ लाख १८ हजार टन गव्हाचा साठा होता. तो ऑक्टोबरच्या प्रारंभी २२७ लाख ४६ लाख टनांवर होता. तर १ सप्टेंबर रोजीचा साठा २४८ लाख २२ हजार टन गहू सरकारच्या गोदामांमध्ये होता. मात्र अन्न सुरक्षेच्या नियमानुसार १ ऑक्टोबरपर्यंत २०५ लाख २० हजार टन बफर स्टाॅक असणं गरजेचं आहे.

पण १ सप्टेंबर २०२१ रोजी सरकारकडील बफर स्टाॅक ४६८ लाख ५२ हजार टनांवर होता. म्हणजेच गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा गव्हाचा साठा २४६ लाख ३४ हजार टनाने कमी आहे. सरकारकडे गव्हाचा साठा कमी असल्याने सध्या दर वाढलेले असूनही सरकारला खुल्या बाजारात गव्हाची विक्री करता येत नाही.

तांदळाचा विचार करता, सध्या सरकारकडे १८६ लाख टनांचा बफर स्टाॅक आहे. तर १ ऑक्टोबर रोजी २०४ लाख ६७ हजार टनांवर साठा होता. तर मागील वर्षी म्हणजेच १ ऑक्टोबर २०२१ रोजी सरकारच्या गोदामांमध्ये २५३ लाख २६ हजार टन तांदूळ होता. म्हणजेच यंदा ४८ लाख ५९ हजार टनाने कमी साठा उपलब्ध आहे. तसचे भाताचा विचार करता यंदा ११८ लाख २५ हजार टनांवर स्टाॅक होता. तर तो मागीलवर्षी १४० लाख ६७ हजार टन होता. म्हणजेच यंदा सरकारकडे गेल्यावर्षीपेक्षा २२ लाख ४२ हजार टनाने भाताचा साठा कमी आहे.

सरकार आता खरिपातील भाताची खरेदी करत आहे. त्यामुळे भाताचा साठा जास्त दिसेल. मात्र रब्बीचा गहू एप्रिल महिन्यापासून बाजारात येऊ शकतो. तोपर्यंत गव्हाचा तुटवडा जाणवण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्या गव्हाचे दर वाढलेले आहेत.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com