Buldana APMC Election : बुलडाण्यात कुठे महाविकास आघाडी, तर कुठे भाजप-सेना

बुलडाणा जिल्ह्यात महाविकास आघाडीने बुलडाणा, खामगाव, देऊळगावराजा या तीन बाजार समित्यांवर वर्चस्व कायम ठेवण्यात यश मिळवले, तर मलकापूर बाजार समितीवर भाजपचे माजी आमदार चैनसुख संचेती यांच्या नेतृत्वात मोठा विजय मिळवला.
Buldana APMC Election
Buldana APMC ElectionAgrowon

Buldana APMC Election जिल्ह्यात बाजार समित्यांच्या पहिल्या टप्प्यात शुक्रवारी (ता. २८) झालेल्या निवडणुकीचे निकाल आले आहेत. बाजार समित्यांवरील वर्चस्व राखण्यात सत्तारूढ गटांना प्रचंड ओढाताण करावी लागली. काही ठिकाणी महाविकास आघाडी, तर कुठे भाजप-शिवसेनेचे पॅनेल विजयी झाले आहे.

बुलडाणा जिल्ह्यात महाविकास आघाडीने बुलडाणा, खामगाव, देऊळगावराजा या तीन बाजार समित्यांवर वर्चस्व कायम ठेवण्यात यश मिळवले, तर मलकापूर बाजार समितीवर भाजपचे माजी आमदार चैनसुख संचेती यांच्या नेतृत्वात मोठा विजय मिळवला. मेहकर बाजार समितीत खासदार प्रतापराव जाधव, आमदार संजय रायमुलकर यांच्या गटाने एकहाती विजय मिळवला.

Buldana APMC Election
APMC Election Maharashtra : बाजार समितींच्या कारभाराच्या चाव्या कोणाकडे राहणार? आज निकाल

जिल्ह्यात शुक्रवारी (ता. २८) या पाच समित्यांसाठी मतदान व नंतर रात्री मतमोजणी झाली. बुलडाणा बाजार समितीत उद्धव ठाकरे यांच्या गटाचे जिल्हाध्यक्ष जालिंदर बुधवत यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीने १२ जागांवर विजय मिळवला. या बाजार समितीत शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड व भाजपच्या पॅनेलला पराभव स्वीकारावा लागला.

मेहकरमध्ये खासदार जाधव यांच्या भूमिपूत्र पॅनेलने १८ पैकी ११ जागा जिंकल्या. देऊळगावराजाला राष्ट्रवादीचे आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने १५ जागा जिंकल्या.

खामगाव समितीत माजी आमदार दिलीप सानंदा यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीच्या पॅनेलने १५ जागा जिंकल्या. भाजपचे आमदार आकाश फुंडकर यांच्या पॅनेलला तीन जागांवर समाधान मानावे लागले.

Buldana APMC Election
Pune APMC Election : पुणे बाजार समितीच्या किल्ल्‍या भाजप पुरस्कृत ‘राष्‍ट्रवादी’च्या ताब्यात

मेहकरमध्ये आघाडीला सात जागा

मेहकर येथे १८ पैकी ११ जागा जिंकून खासदार जाधव यांच्या भूमिपुत्र पॅनेलने सत्ता कायम ठेवण्यात यश मिळवले. मात्र, समितीच्या निवडणुकीत १८ पैकी ११ जागा जिंकून खासदार जाधव यांच्या भूमिपुत्र पॅनेलने सत्ता कायम ठेवण्यात यश मिळवले.

मात्र, महाविकास आघाडीने ७ जागांवर यश मिळवले. सतत २७ वर्षे या बाजार समितीवर खासदार जाधव यांच्या गटाची सत्ता आहे. विरोधी मिळणे मुश्किल होते. मेहकर येथे मतमोजणी पहाटे अडीच वाजेपर्यंत चालली.

सेवा सहकारी संस्था गटातून खासदार गटाचे माधवराव जाधव, मदन नारायण भोसले, भगवान नारायण लहाने, रेखाताई सुरेश काळे, लक्ष्मी सहाने, विकास रावजी मोहरुत असे सहा उमेदवार विजयी झाले,

तर महाविकास आघाडीचे राहुल किशोर देशमुख, ॲड. सुरेश वानखेडे, संजय परमेश्‍वर वडतकर, विलास प्रभाकर बचाटे, अशोक दत्तात्रय लंबे असे पाच उमेदवार विजयी झाले. राजीव निकम आणि अशोक लंबे यांना समान मते मिळाल्याने ईश्‍वरचिठ्ठी काढली. त्यात लंबे विजयी झाले.

ग्रामपंचायत मतदार संघातून भूमिपुत्रचे अरविंद दळवी, ब्रह्मचारी धोंडगे, महादेव चंद्रभान वाघ विजयी ठरले, तर आघाडीचे स्वप्नील गाभणे यशस्वी ठरले. व्यापारी अडते मतदार संघात भूमिपुत्रचे दीपक जवंजाळ, अशोक लोढे विजयी झाले. हमाल मापारी संघातून आघाडीचे इब्राहिम कालू रेघीवाले विजयी ठरले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com