Kalwan Bull market : कळवणमध्ये जनावरे विक्री बंदचे आदेश झुगारून बैलबाजार सुरू

पशुवैद्यकीय प्रशासनाचा तहसील कार्यालयाकडे पत्रव्यवहार
Bull market
Bull marketAgrowon

ॲग्रोवन वृत्तसेवा
कळवण, जि. नाशिक : देशात लम्पी स्कीन (Lumpy Skin) आजारांचे थैमान सुरू असताना प्रशासनाने जनावरे बाजार विक्री बंद केली आहे. मात्र कळवण शहर याला अपवाद आहे. शहरालगत मध्य प्रदेश येथील बैल व्यापाऱ्याने प्रशासनाच्या नाकावर टिच्चून बैल बाजार जनावरे विक्री करत आहे.
कळवण तालुक्यात गोवर्गीय ५३ हजार ९१४ नोंदणीकृत जनावरे आहेत. तालुका पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मते संपूर्ण लसीकरण पूर्ण झाले आहे. मात्र तालुक्यात काही शेतकऱ्यांनी नवीन जनावरे विकत आणले आहेत. त्यापासून तालुक्यात लम्पी स्कीन आजाराचा फैलाव प्रसार झाला आहे. तालुक्यातील बापखडा येथील शेतकरी सुनील यशवंत चौरे यांचा बैल, उत्तम उखा आहेर यांची गाय व मार्कडपिंप्री यांचा रामू गोविंदा ढुमसे यांचा बैल असे तीन जनावरे दगावले आहेत. तर ९ जनावरे बाधित आहेत. बाधित जनावरांवर उपचार सुरू आहेत.

Bull market
साताऱ्यातील १७ कृषी सेवा केंद्रांना विक्री बंदचे आदेश

तालुक्यात इतर ठिकाणांहून लम्पी स्कीन आजार येऊन जनावरे बाधित होऊ नये म्हणून जनावरे खरेदी विक्रीवर शासनाने बंदी घातली आहे. परंतु कळवण तालुक्यात सर्रास आदेशाची पायमल्ली सुरू आहे. कळवण शहराच्या गणेशनगर भागात व नाकोडा रोड येथे मध्य प्रदेशातून बैल विक्रीसाठी आणले जात आहे. येथे दररोज बैलांचा बाजार भरतो याकडे स्थानिक महसूल अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष आहे. या बैल बाजारामुळे तालुक्यात लम्पी स्कीनचा प्रसार होऊन मोठी हानी होऊ शकते. त्यामुळे हा बैल बाजार बंद करावा, अशी मागणी स्थानिक शेतकरी व पशुपालकांनी केली आहे.


गोवंश जनावरांना लसीकरण करूनही ‘लम्पी स्कीन’ आजाराने तालुक्यात शिरकाव केला आहे. त्यामुळे तालुक्यात बाहेरून येणाऱ्या जनावरे विक्रीवर बंदी करावी. तसेच, तालुक्यातील जनावरांची संख्या बघता पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची संख्या कमी आहे. मोठी आपत्ती आल्यास प्रशासनाची तारांबळ उडणार आहे. रिक्त जागा तत्काळ भराव्यात.
- अंबादास जाधव, तालुकाप्रमुख, शिवसेना

बैल व गोवर्गीय जनावर विक्रीवर बंदी आहे. कळवणच्या आजूबाजूला सुरू असलेल्या बैल बाजाराबाबत. तहसील कार्यालयाकडे पत्रव्यवहार केला असून, संबंधितांवर लवकर कारवाई होईल.
-डॉ. एन. डी. पाईकराव, तालुका पशुवैद्यकीय अधिकारी

Bull market
Lumpy Skin : वासरातील ‘लम्पी स्कीन’चे नियंत्रण

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com