
विक्रमगड : विक्रमगड तालुक्यात शेतकऱ्यांकडून भात (Paddy Crop) हे मुख्य पीक घेतले जात असले, तरी या वर्षीच्या खरीप हंगामात (Kharif Season) येथील शेतकऱ्यांकडून तुरीची मोठ्या प्रमाणात लागवड (Tur Sowing) करण्यात आली होती.
ग्रामीण भागातील लागवडीमुळे शेतकऱ्यांना स्वस्तात तूर उपलब्ध झाली आहे. त्यामुळे दर वर्षी खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात आंतरपीक म्हणून तुरीचे उत्पन्न घेण्यासाठी शेतकरी प्रयत्नात आहेत. तुरीतील पोषक घटकांमुळे कुपोषणावरही मात करण्यास मदत होत असते.
विक्रमगड तालुक्यात पावसाळ्यामध्ये प्रामुख्याने पारंपरिक पद्धतीने भातशेती केली जाते. त्यातून येणारे उत्पन्न अत्यंत मर्यादित स्वरूपात असते.
काही शेतकरी अत्याधुनिक पद्धतीने शेती करत असले, तरी केवळ भातशेतीवर अवलंबून राहणे त्यांनाही आता कठीण होऊन बसले आहे. त्यात भातशेतीमध्ये उत्पादन खर्च जास्त, तर पैसे कमी मिळतात. त्यामुळे काही शेतकरी बांधावरील तूर लागवड करत आहेत.
कृषी विभागाकडून प्रोत्साहन
शेतकरी आंतरपीक आणि इतर पिकांचे उत्पन्न घेण्यासाठी शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून प्रोत्साहित केले जाऊ लागले आहे. तूर, कडवे वाल, हरभरा, उडीद लागवडीसाठी प्रोत्साहन देऊन उत्पादन वाढवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
अळीचा प्रादुर्भाव
उंदीर, शेंगा पोखरणारी अळी, पिसारी पतंग, शेंगमाशी, पाने व फुले जाळी करणारी अळी, शेंगावरील ढेकूण अशा अनेक किडींचा प्रादुर्भाव तूरपिकावर होत असतो.
त्यामुळे उत्पादनात घट होत असते. औषध फवारणी अथवा रासायनिक खते न वापरता हे पीक घेता येत असल्यामुळे शेतकऱ्यांना काहीअंशी नफा मिळत असतो.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.