Cotton Market : शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यास गुजरातमधून अटक

पिंपळगाव हरेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील शेतकऱ्यांनी राजू पाटील या व्यापाऱ्यास सुमारे एक कोटी रुपयांचा कापूस दिला होता. पेमेंट आठ दिवसांत देतो, असे सांगून तो फरारी झाला होता.
Cotton Market
Cotton MarketAgrowon

पाचोरा, जि. जळगाव ः पिंपळगाव हरेश्वर (ता. पाचोरा) पोलिसांनी शेतकऱ्यांचा कापूस (Cotton) घेऊन त्यांचे पैसे न देता फसवणूक (Froud With Farmer) करणाऱ्या राजू पाटील (रा. वाडी, ता. पाचोरा) या व्यापाऱ्यास वर्षभरानंतर ताब्यात घेण्यात यश मिळविले आहे.

Cotton Market
Cotton Futures : कापूस वायद्यांवरून गैरसमज

पिंपळगाव हरेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील शेतकऱ्यांनी राजू पाटील या व्यापाऱ्यास सुमारे एक कोटी रुपयांचा कापूस दिला होता. पेमेंट आठ दिवसांत देतो, असे सांगून तो फरारी झाला होता. परंतु पैसे मिळत नसल्याने व फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने शेतकऱ्यांनी सहायक पोलिस निरीक्षक महेंद्र वाघमारे व उपनिरीक्षक अमोल पवार यांना सर्व प्रकार सांगितला.

Cotton Market
Cotton Theft : कापूस चोरणारे पाच संशयित ताब्यात

फसवणूक रकमेचा आकडा मोठा असल्याने त्यांनी पोलिस अधीक्षक एम. राजकुमार, अपर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, पोलिस उपअधीक्षक भारत काकडे यांना सांगितले. वरिष्ठांचे आदेश व शेतकऱ्यांच्या तक्रारीनुसार तपास पथके नेमण्यात आली.

जितेंद्र पाटील व मुकेश लोकरे यांच्या पथकाने सर्व माहिती जमा केली, मोबाईल रेकॉर्ड काढले. संशयित व्यापारी गुजरातला असल्याचे कळाल्याने त्यांनी गुजरात गाठले. स्थानिक पोलिसांची मदत घेऊन संशयित शिताफीने पकडले. त्यास पाच दिवसांची पोलिस कस्टडी मिळाली आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com