Crop Loan : पीक कर्जाचे वाटप ६०.४६ टक्के

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे उद्दिष्टापेक्षा जास्त कर्जवाटप झाले आहे. परंतु राष्ट्रीयीकृत बँका आणि खासगी बँकांचे कर्ज वाटप रखडत चालल्यामुळे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट यंदाही अपूर्ण राहण्याची शक्यता आहे.
Crop Loan
Crop LoanAgrowon

परभणी : यंदाच्या खरीप हंगामात (Khreef Season)परभणी जिल्ह्यात गुरुवार (ता. १५) पर्यंत सर्वं बँकांनी मिळून एकूण ९७ हजार ९२५ शेतकऱ्यांना ७२८ कोटी २ लाख रुपये (६०.४६ टक्के) वाटप केले आहे. त्यात १६ हजार २४७ शेतकऱ्यांना १५० कोटी ७९ लाख रुपये एवढे नवीन पीककर्ज तसेच ८१ हजार ६७८ शेतकऱ्यांनी ५७७ कोटी २३ लाख रुपये एवढ्या नूतनीकरण केलेल्या कर्जाचा Crop Loan) समावेश आहे.

Crop Loan
Jute Crop : ताग पीक जोमात

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे उद्दिष्टापेक्षा जास्त कर्जवाटप झाले आहे. परंतु राष्ट्रीयीकृत बँका आणि खासगी बँकांचे कर्ज वाटप रखडत चालल्यामुळे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट यंदाही अपूर्ण राहण्याची शक्यता आहे. यावर्षीच्या खरिपात जिल्ह्यात १ हजार २०४ कोटी १५ लाख रुपये पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट आहे.

Crop Loan
Crop Damage : गोंदिया जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे १७ कोटी रुपयांचे नुकसान

त्यात राष्ट्रीयीकृत (व्यापारी) बॅंका ७६८ कोटी २४ लाख रुपये, खासगी बँका ९९ कोटी ६८ लाख रुपये, महाराष्ट्र ग्रामीण बँक १८४ कोटी ६४ लाख रुपये, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक १५१ कोटी ५९ लाख रुपये एवढ्या उद्दिष्टाचा समावेश आहे. गुरुवार (ता. १५) पर्यंत राष्ट्रीयकृत बँकांनी २९ हजार २९१ शेतकऱ्यांना २८९ कोटी ८९ लाख रुपये (३७.७३ टक्के),

Crop Loan
Lumpy Skin : महाराष्ट्रात ‘लम्पी स्कीन’ आजार नियंत्रणात

खासगी बँकांनी २ हजार ३६५ शेतकऱ्यांना २५ कोटी ५५ लाख रुपये (२५.६३ टक्के) पीककर्ज वितरित केले. महाराष्ट्र ग्रामीण बँकेने २८ हजार ७९८ शेतकऱ्यांना २५७ कोटी ५१ लाख रुपये १३९.४७ टक्के), जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने ३७ हजार ४७१ शेतकऱ्यांना १५५ कोटी ७ लाख (१०२.३० टक्के) पीककर्ज वाटप केले आहे.

गतवर्षी (२०२१) याच तारखेपर्यंत सर्व बँकांनी एकूण ९८ हजार २६३ शेतकऱ्यांना ६६५ कोटी १ लाख रुपये (५४.८१) एवढे पीककर्ज वाटप केले होते.

गुरुवार ता.१५ सप्टेंबर पर्यंतची पीककर्ज वाटप स्थिती (कोटी रुपयात)

बँक उद्दिष्ट वाटप कर्ज रक्कम शेतकरी संख्या टक्केवारी

भारतीय स्टेट बँक ४९२.०६ २११.७५ २२३७० ४३.०३

महाराष्ट्र ग्रामीण बॅंक १८४.६४ २५७.५१ २८७९८ १३९.४७

जिल्हा सहकारी बॅंक १५१.५९ १५५.०७ ३७४७१ १०२.३०

बँक ऑफ बडोदा ५६.६३ ८.४७ ७७५ १४.९६

बॅक ऑफ इंडिया १०.१६ २.६५ २५८ २६.०८

बँक ऑफ महाराष्ट्रा ६९.४९ ३९.०६ ३०७९ ५६.२१

कॅनरा बँक ४०.७० ६.७५ ७६० १६.५८

सेंट्रल बँक ऑफ इंडिया १०.४१ ४.२८ ४०८ ४१.११

इंडियन बँक २०.७७ २.२७ २२७ १०.९३

इंडिय ओव्हरसिज बँक ८.९४ ४.५१ ३४० ५०.४५

पंजाब नॅशनल बँक ९.३३ ०.४० ४० ४.२९

युको बँक २०.३४ ४.३३ ४११ २१.२९

युनियन बँक २९.४१ ५.४२ ६२८ १८.४३

अॅक्सिस बँक १०.७७ ०.५० ११ ४.६४

एचडीएफसी बँक ३२.८७ १०.०८ ५४६ ३०.६७

आयसीआयसीआय बँक २५.९५ १०.५४ ९४२ ४०.६२

आयडीबीआय बँक ३०.०९ ४.४३ ८६६ १४.७२

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com