आपत्ती निवारणासाठी मंत्रिमंडळ उपसमितीची स्थापना करणार

राज्यात येणाऱ्या नैसर्गिक संकटावेळी मदत पुनर्वसन तसेच इतर बाबतीत योग्य तो निर्णय घेण्यामध्ये सुसूत्रता राहावी म्हणून मंत्रिमंडळ उपसमितीची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला.
Eknath Shinde
Eknath ShindeAgrowon

पुणे ः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Sjinde) आणि उपमुख्यमंत्री फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (ता. २१) मंत्रिमंडळाची बैठक झाली. आपत्ती निवारणाच्या (Disaster Relief) विविध प्रकरणांची चर्चा व निर्णय घेण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमितीची (Sub Committee For Disaster Relief) स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला.

Eknath Shinde
हवामान बदलाशी सामना करण्यासाठी राष्ट्रीय कृषी आपत्ती व्यवस्थापन योजना

राज्यात येणाऱ्या नैसर्गिक संकटावेळी मदत पुनर्वसन तसेच इतर बाबतीत योग्य तो निर्णय घेण्यामध्ये सुसूत्रता राहावी म्हणून मंत्रिमंडळ उपसमितीची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला. या शिवा. बार्शी येथील लक्ष्मी सोपान अॅग्रिकल्चर प्रोड्यूस मार्केटिंग कंपनी या खासगी बाजार समितीचा कांदा अनुदान योजनेत समावेश करण्याचा निर्णय देखील या वेळी घेण्यात आला.

Eknath Shinde
Eknath Shinde : मराठवाड्यासाठी भरीव निधी देणार : मुख्यमंत्री शिंदे

मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय

वर्ग-३ मधील लिपिकांची सर्व रिक्त पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरणार

धारावी पुनर्विकासासाठी पुन्हा नव्याने निविदा मागवून तसेच प्रकल्पाला अतिरिक्त सवलती देऊन प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यास मान्यता

भारतरत्न लता मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयात प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करणार

पु. ल. देशपांडे अकादमीत तात्पुरत्या काळासाठी महाविद्यालयाच्या कामकाजास २८ सप्टेंबरपासून प्रारंभ करणार

राज्य मालमत्ता पुनर्रचना कंपनी स्थापन करणार

पोलिस शिपाई ते पोलिस निरीक्षक यांच्या नैमित्तिक रजा १२ पासून २० इतक्या वाढवण्याचा निर्णय

सफाई कामगारांच्या वारसा हक्काच्या अंमलबजावणीत सुधारणा करण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करणार

नाशिक येथील शासकीय अध्यापक विद्यालयाच्या मुलींच्या वसतिगृहासाठी भाडे तत्त्वावर जागा देणार

वडसा देसाईगंज-गडचिरोली या नवीन रेल्वे मार्गाच्या कामाला वेग देणार

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com