नागरिकांची तारांबळ; गारपिटीमुळे वातावरणात गारवा

यंदाच्या उन्हाळ्यात सूर्याने चांगलीच आग ओकली. असाह्य उन्हामुळे नागरिकांनी घराबाहेर पडणेही टाळले. यंदा मॉन्सूनचे वेळेत आगमन होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
नागरिकांची तारांबळ; गारपिटीमुळे वातावरणात गारवा

यवतमाळ : उन्हाचा पारा ४४ ते ४५ अंशांवर स्थिरावला असताना शुक्रवारी (ता. २०) सायंकाळी सहाच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाल्याने काही प्रमाणात नागरिकांची उकाड्यापासून सुटका झाली.

यंदाच्या उन्हाळ्यात सूर्याने चांगलीच आग ओकली. असाह्य उन्हामुळे नागरिकांनी घराबाहेर पडणेही टाळले. यंदा मॉन्सूनचे वेळेत आगमन होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यामुळे नागरिकांसह शेतकऱ्यांना मॉन्सूनच्या पावसाचे वेध लागले असताना, शुक्रवारी दुपारी सोसाट्याच्या वाऱ्याला सुरुवात होऊन विजांचा कडकडाट सुरू झाला.

काही वेळात जोरदार पावसाने हजेरी लावली. बाभूळगाव तालुक्यात काही ठिकाणी गारपीट झाली. यवतमाळ शहरातही तुरळक गारपीट पडली. पावसाने बराच वेळ बॅटिंग केल्याने खरेदीसाठी बाजारपेठेत आलेल्या नागरिकांची तारांबळ उडाली.

विजेचा लंपडाव

नागरिक आपल्या घरात गारवा शोधत असताना गुरुवारी (ता. १९) रात्री अकरा ते एक वाजेच्या दरम्यान सारखा वीजपुरवठा सुरू, बंद होत होता. दोन तासांच्या कालावधीत जवळपास २५ ते ३० वेळा विजेचा लपंडाव सुरू होता. शनिवारीही (ता. २१) पुन्हा वीजपुरवठा खंडित झाला होता. सायंकाळी उशिरापर्यंत वीजपुरवठा सुरळीत झालेला नव्हता.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com