Agri. Innovation Program : अॅग्री-इनोव्हेशन प्रोग्राम’ साठी अर्ज करण्याचे आवाहन

या कार्यक्रमाचे उद्दिष्ट स्थानिक शेतकऱ्यांना मदत आणि लाभ मिळवून देण्यासाठी कृषी-संलग्न स्टार्ट-अॅप्सना मदत करणे हा आहे.
Agri. Innovation Program
Agri. Innovation ProgramAgrowon

माळेगाव ः कॅपजेमिनी इंडियाने (capgemeni India) येथील अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, आयकेअर, एआयसी एडीटी बारामती फाउंडेशन यांच्यासमवेत ‘अॅग्री-इनोव्हेशन प्रोग्रॅम’ सुरु केला आहे. या कार्यक्रमाचे उद्दिष्ट स्थानिक शेतकऱ्यांना मदत आणि लाभ मिळवून देण्यासाठी कृषी-संलग्न स्टार्ट-अॅप्सना (Agricultural Startup) मदत करणे हा आहे.

Agri. Innovation Program
Lumpy Skin : ‘लम्पी’ आजाराबाबत सूक्ष्म नियोजन करा

या उपक्रमांतर्गत स्टार्ट-अप्सचे इनक्युबेशन, फील्ड ट्रायलस, शेतकरी जोडणे, संकल्पनेचा पुरावा, कल्पना प्रमाणीकरण, जागतिक दर्जाच्या मार्गदर्शकांपर्यंत पोहोचणे, संशोधन प्रयोगशाळांच्या सुविधांमध्ये प्रवेश आणि स्टार्टअप इकोसिस्टीममधील स्टेकहोल्डर लिंकेज यांसारख्या सुविधा पुरविण्यात येतील.

Agri. Innovation Program
Lumpy Skin : परभणी जिल्ह्यात म्हशींच्या वाहतुकीस अटींसह परवानगी

शेतकऱ्यांच्या समस्यांचे निराकरण करण्याची क्षमता असलेल्या तंत्रज्ञान आधारित स्टार्टअप्सकडून याकरिता अर्ज मागविण्यात येत आहेत. फाउंडेशनच्या संकेतस्थळावरील https://bit.ly/Agri-innovation-Accelerator या लिंकवर अर्ज मागविण्यात येत आहेत.

Agri. Innovation Program
Lumpy Vaccination : लोकसहभागातून ६४ हजारांवर पशुधनाचे लसीकरण

बुलेट्स

...या समस्यांवर हवे निराकरण

- माती, वनस्पतींच्या ऊतींमधील मॅक्रो/सूक्ष्म पोषक घनता आणि मातीतील सूक्ष्मजीव विविधता तपासणी चाचणीसाठी जलद, अचूक आणि परवडणारी उपकरण पद्धत

- रासायनिक, जैविक आयआर पद्धतींद्वारे उत्पादनाचे शेल्फ लाइफ वाढविण्यासाठी आणि काढणीनंतरचे नुकसान कमी करणारे तंत्रज्ञान

- डाळिंबातील जीवाणूजन्य (तेलकट) रोगाचा प्रादुर्भाव शोधून त्यावर उपचार करणारे तंत्रज्ञान.

- कृषी उत्पादनांचे शेल्फ लाइफ वाढवण्यासाठी नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान

- निर्यात गुणवत्तेच्या कृषी उत्पादनासाठी नावीन्यपूर्ण अवशेष विश्लेषण पद्धत

- खाद्यपदार्थांची भेसळ तपासण्यासाठी नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान

- नावीन्यपूर्ण कृषी अवजारांचा विकास आणि उत्पादन

- रासायनिक कीटकनाशके आणि कीटकनाशकांसाठी नवीन जैविक पर्याय

- ताज्या शेती उत्पादनांसाठी स्मार्ट आणि ऊर्जा कार्यक्षम साठवण सुविधा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com