आठ परिमंडळात देणार कॅन्सर डायग्नॉस्टिक व्हॅन

या रुग्णांचे निदान वेळेत न झाल्याने गंभीर स्वरूप प्राप्त होते. त्यामुळे अनेकदा या रुग्णांचा जीव वाचवणेही शक्य होत नाही. त्यामुळे अशा रुग्णांच्या आजाराचे निदान पहिल्या टप्प्यातच झाल्यास जिवाला धोका निर्माण होत नाही.
आठ परिमंडळात देणार कॅन्सर डायग्नॉस्टिक व्हॅन
cancer diagnostic vanAgrowon

मुंबई : राज्यातील कर्करोग्रस्तांना तातडीने उपचार मिळावेत, या साठी आरोग्य विभागाच्या वतीने ८ परिमंडळात प्रत्येकी एक अशा आठ कॅन्सर डायग्नॉस्टिक व्हॅन उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यासाठी सुमारे ११ कोटींच्या खर्चाला मान्यता देण्यात आली आहे.

राज्यात कॅन्सरच्या विविध प्रकारांचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळतात. या रुग्णांचे निदान वेळेत न झाल्याने गंभीर स्वरूप प्राप्त होते. त्यामुळे अनेकदा या रुग्णांचा जीव वाचवणेही शक्य होत नाही. त्यामुळे अशा रुग्णांच्या आजाराचे निदान पहिल्या टप्प्यातच झाल्यास जिवाला धोका निर्माण होत नाही.

राज्यात मौखिक, स्तनाचे, गर्भाशय, मुखाचा कर्करोग या तीन प्रकारचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळतात. या तीनही प्रकारात तातडीने निदान आणि उपचार केल्यास रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही चांगले आहे. हे रुग्ण शोधण्यासाठी राज्यात नियमित सर्वेक्षण केले जाते. संशयित रुग्णांचे निदान करण्यासाठी बायोप्सी करणे आवश्यक असते.

रुग्णांची बायोप्सी वेळेत होणे गरजेचे असते. त्यामुळे आरोग्य विभागातर्फे कॅन्सर डायग्नॉस्टिक व्हॅन देण्यात येणार आहेत. ठाणे, पुणे, कोल्हापूर, औरंगाबाद, लातूर, नागपूर, अकोला आणि नाशिक या आरोग्य विभागांच्या परिमंडळांमध्ये व्हॅन देण्यात येतील. या व्हॅन प्रशिक्षित मनुष्यबळाऐवजी पडून राहू नयेत म्हणून आधीच मनुष्यबळाची तयारी करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. या व्हॅनची उपकरणांसह किंमत ९९ लाख, ९४ हजार ६५० कोटी आहे. या व्हॅनमधील मनुष्यबळासाठी प्रतिवर्षी खर्च १ कोटी ८० लाख अपेक्षित आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com