Sugarcane Crushing : देशात ऑक्टोबरमध्ये ऊस गाळप मंदावले

पाऊस थांबल्याने नोव्हेंबरमध्ये गती येण्याची शक्यता
Sugarcane Crushing
Sugarcane CrushingAgrowon

राजकुमार चौगुले : ॲग्रोवन वृत्तसेवा

कोल्हापूर : लांबलेल्या पावसामुळे देशातील गळीत हंगाम (Sugarcane Crushing) कासवाच्या गतीने सुरू आहे. देशाचा हंगाम सुरू होऊन एक महिना झाला तरी ऑक्टोबरमध्ये हंगामाला गती आली नसल्याचे चित्र होते. गेल्या काही दिवसांपासून पावसाने पूर्णपणे उघडीप दिल्याने येत्या पंधरवड्यात गळीत हंगामाला गती येण्याची शक्यता आहे.

Sugarcane Crushing
Sugarcane Crushing : गाळप हंगामाला अखेर सुरुवात

महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात व तामिळनाडूत हंगामास प्रारंभ झाला आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरअखेर १६० कारखाने सुरू झाले होते. यंदा १३४ कारखाने सुरू झाले आहेत. ऑक्टोबरच्या पूर्वर्धापासून मध्यापर्यंत देशभरात जोरदार पाऊस झाला याचा परिणाम साखर हंगामावर झाला आहे. महाराष्ट्र, कर्नाटकात १५ ऑक्टोबरपासून गाळप हंगाम सुरू झाला. उत्तर प्रदेशात केवळ आठ कारखाने सुरू झाले आहेत. गुजरातमध्ये अद्याप एकही कारखाना सुरू झाला नाही. बारा राज्यांमध्ये ऊस उत्पादन घेतले जाते. यापैकी केवळ चार राज्यांत गळीत हंगामास प्रारंभ झाला आहे.

Sugarcane Crushing
Sugarcane Crushing : पहिल्या पंधरवड्यात केवळ ४३ कारखाने सुरू

पावसामुळे देशातील गळीत हंगामाचा प्रारंभ ही विस्कळीतच झाला. महाराष्ट्र बरोबर ऊस उत्पादक राज्यांमध्येही पावसाने जोर धरल्याने हंगामास अत्यंत धीम्या गतीने प्रारंभ झाला. ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत कारखान्यांनी गळीत हंगाम सुरू केला खरा, पण उसाअभावी तो रखडतच चालला.

गेल्या वर्षी ऑक्टोबर अखेरपर्यंत ६७ लाख टन उसाचे गाळप झाले होते. यंदा ५७ लाख टन इतके गाळप झाले. गेल्या वर्षी या कालावधीत ४.७५ लाख टन साखरेची निर्मिती झाली होती यंदाची निर्मिती ४ लाखांवर आली आहे. नोव्हेंबरपासून गळीत हंगाम गती घेईल, अशी अपेक्षा राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. यंदा ३६०० लाख टन विक्रमी ऊस गाळप अपेक्षित असल्याची माहिती संघाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.

देशात अजूनही काही भागांत ओलसरपणामुळे ऊस तोडी पूर्ण क्षमतेने सुरू झाल्या नाहीत; मात्र पाऊस पूर्णपणे थांबल्याने ही परिस्थिती बदलून नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून ऊस हंगाम गतीने सुरू होईल तसेच बंद असलेले कारखानेही सुरू राहतील, असे संघाच्या सूत्रांनी सांगितले.

Sugarcane Crushing
Cotton Production: देशातील कापूस उत्पादकता कमी का ? | ॲग्रोवन

पावसामुळे विशेष करून महाराष्ट्राचा गळीत हंगाम लांबण्याची शक्यता आहे. तोडणीला जाणाऱ्या उसाचे वजनही वाढले आहे. यामुळे ऊस तोडणी उशिरा होईल, अशी शक्यता आहे. महाराष्ट्रातील हंगाम गेल्यावर्षीप्रमाणेच जूनपर्यंत वाढू शकतो.

- जयप्रकाश दांडेगावकर, अध्यक्ष राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com