Cashew Crop Disease : अतिधुक्याचा काजू आणि आंबा पिकाला फटका

अतिधुक्याचा परिणाम आंबा, काजू पिकांवर दिसून येत आहे. आंबा आणि काजूला अजूनही मोहोर येत आहे. या मोहोरावर अतिधुक्याचा परिणाम दिसत आहे.
Cashew Crop
Cashew Crop Agrowon

सिंधुदुर्गनगरी ः जिल्ह्यात सध्या मोठ्या प्रमाणात धुके (Heavy Fogg) पडत असून त्याचा काजू पिकावर (Cashew Crop) विपरीत परिणाम जाणवू लागला आहे. काजूवर (Cashew Crop Disease) बुरशीचा प्रादुर्भाव जाणवत असून काही भागात काजूचा मोहोर काळा पडत असल्याचे चित्र आहे.

Cashew Crop
Cashew Crop : मडुरा बाबरवाडीत आगीत काजूची ४० झाडे जळाली

जिल्ह्यात दोन ते तीन दिवस ढगाळ वातावरण होते. त्यानंतर वातावरण निवळले असले तरी पहाटेच्या वेळी प्रचंड धुके पडत आहे. अतिधुक्याचा परिणाम आंबा, काजू पिकांवर दिसून येत आहे. आंबा आणि काजूला अजूनही मोहोर येत आहे.

या मोहोरावर अतिधुक्याचा परिणाम दिसत आहे. सकाळी नऊ वाजेपर्यंत धुके पडत असल्यामुळे धोका अधिकच वाढला आहे. बुरशीमुळे काजूला आलेला मोहोर काळ पडत आहे. जिल्ह्याच्या बहुतांशी भागात धुक्याचे प्रमाण सारखेच आहे.

Cashew Crop
Mango Export : राज्यातून अडीच हजार टन आंबा निर्यातीचे उद्दिष्ट

डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसानंतर जिल्ह्यातील बागायतदारांनी प्रचंड मेहनत करीत काजू बागांचे व्यवस्थापन केले. अनेक शेतकऱ्यांच्या तीन फवारण्या पूर्ण झाल्या आहेत. परंतु बुरशीच्या प्रादुर्भावामुळे आणखी फवारण्या घ्यावा लागणार आहेत.

ज्या भागात धुक्यांचे प्रमाण अधिक आहे. त्या भागातील काजू पिकाच्या मोहोरावर बुरशीचे प्रमाण जाणवण्याची शक्यता अधिक असते. बुरशीमुळे मोहोर काळा पडतो. अशी स्थिती निर्माण झाल्यास विद्यापीठाने शिफारस केलेल्या बुरशीनाशकांची कृषी तज्ज्ञांच्या सल्ल्याने फवारणी करावी

- प्रा. विवेक कदम, काजू अभ्यासक, कृषी महाविद्यालय सांगुळवाडी

काजूला मोहोर चांगला आला होता. परंतु अलीकडे पडत असलेल्या धुक्यामुळे बुरशीचा प्रादुर्भाव जाणवत असून मोहोर काळा पडताना दिसत आहे.

- रमेश पवार, शेतकरी, खांबाळे, ता. वैभववाडी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com