Lumpy Skin : ‘लम्पी स्कीन’मुळे गुरे बाजार बंद

या आजाराचा फैलाव होऊ नये यासाठी जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये गुरांचा बाजार बंद करण्यातआला असून जनावरांच्या शर्यती व प्रदर्शन बंद करण्यात आले आहे, अशी माहिती पशुसंवर्धन विभागाने दिली आहे.
Lumpy Skin
Lumpy SkinAgrowon

ठाणे : ठाणे जिल्ह्यात लम्पी त्वचारोगामुळे (Lumpy Skin Disease) आजपर्यंत २६ जनावरे बाधित आढळली आहेत. या आजाराचा फैलाव होऊ नये यासाठी जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये गुरांचा बाजार बंद करण्यात आला असून जनावरांच्या शर्यती व प्रदर्शन बंद करण्यात आले आहे, अशी माहिती पशुसंवर्धन (Department of Animal Husbandry) विभागाने दिली आहे.

Lumpy Skin
Guava Cake : पेरूपासून बनवलाय पुण्यातल्या कयानी बेकरीनं केक! | ॲग्रोवन

ठाणे जिल्ह्यातील शहापूर, भिवंडी, अंबरनाथ या तीन तालुक्यांमध्ये लम्पी रोगाचे १२ केंद्रबिंदू असून २६ जनावरे बाधित आढळून आलेली आहेत. लम्पी त्वचारोगाचे संक्रमण होऊ नये याकरिता जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त जिल्हा ठाणे आणि जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी यांच्याकडून विविध उपाययोजना राबवण्यात येत असून यामध्ये बाधित भागातील पाच किलोमीटर परिघातील परिसरात लसीकरण करण्यात येत आहे.

Lumpy Skin
GM Soybean : ‘जीएम’चा मार्ग करा मोकळा

जिल्ह्यात पाच शीघ्र कृती दलांची स्थापना करण्यात आली आहे. संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव झालेल्या परिसरात सर्व रोग नमुने, बाधित जनावरांना उपचार, रोग प्रतिबंधक लसीकरणाकरिता कोणत्याही प्रकारचे सेवाशुल्क आकारण्यात येत नसून सर्व सेवा मोफत देण्यात येत आहेत. याबाबत जिल्ह्यातील सर्व पशुवैद्यकांना सूचित करण्यात आले आहे.

Lumpy Skin
Cotton Rate : हंगामात कापसाला किती दर मिळू शकतो | Agrowon | ॲग्रोवन

भयभीत होण्याची गरज नाही!

लम्पी त्वचारोगामुळे नागरिकांनी भयभीत होण्याची गरज नाही. हा आजार जनावरांपासून माणसांना होण्याची शक्यता अजिबात नसून, दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या सेवनाने मनुष्यांना कोणत्याही प्रकारचा संसर्ग होत नाही, असे विभागाने कळवले आहे. विभागाकडे आवश्यक सर्व औषधे व लससाठा मुबलक प्रमाणात उपलब्ध असून सर्व क्षेत्रीय अधिकारी व कर्मचारी सतर्क आहेत.

पशुसंवर्धन विभागाचे आवाहन

लम्पीसदृश लक्षणे असलेले जनावर निदर्शनास आल्यास नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधावा अथवा १९६२ या हेल्पलाईनवर कॉल करावा. या आजाराबाबत पशुपालक व नागरिकांनी कोणतीही भीती वा शंका बाळगण्याची गरज नाही, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाकडून करण्यात आले आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com