Cauliflower rate : दर नसल्याने फ्लॉवरमध्ये सोडली जनावरे

बाजारात आवक टिकून, उत्पादन खर्चही निघेना; सटाण्यात शेतकरी हवालदिल
 Cauliflower
CauliflowerAgrowon

नाशिक ः अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे चालूवर्षी भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले. दर होता. मात्र काढणीयोग्य शेतमाल शिवारात पाणी साचून राहिल्याने काढता आला नव्हता. आता भांडवली गुंतवणूक, मेहनत करूनही फ्लॉवर उत्पादन घेतले. मात्र फ्लॉवरला उत्पादन खर्चाच्या खाली दर मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्यामुळे सटाणा तालुक्यातील शेतकऱ्याने फ्लॉवरच्या पिकात जनावरे सोडल्याचे मोरेनगर (ता.सटाणा) येथे पाहायला मिळाले. बाजारात गेल्या एक महिन्यापासून फ्लॉवरची आवक टिकून आहे.

 Cauliflower
काय करावं ? दर, विक्रीव्यवस्था नसल्याने कोबीत सोडल्या शेळ्या

मात्र दरात मोठी घसरण झाल्याने शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही वसूल होत नसल्याची स्थिती आहे. लागवडीपूर्वी तयारी, लागवड, तयार रोपे खरेदी, तण व्यवस्थापन, पीक संरक्षण, काढणी, मजुरी असा फ्लॉवर लागवडीसाठी एकरी लाखांवर खर्च आहे. नोव्हेंबर महिन्यात प्रतिकिलो १० रुपयांच्या जवळपास दर होता. त्यात घसरण होऊन आता अवघे २ ते ३ रुपये प्रतिकिलो दर मिळत आहे. त्यामुळे लागवड केल्यानंतर काढणी करून बाजारात माल नेईपर्यंतचा खर्चसुद्धा वसूल होत नाही. त्यामुळे मोरेनगर (ता. सटाणा) येथील शेतकरी हृषिकेश मोरे यांनी पिकात जनावरे सोडली.

नाशिक बाजार समितीतील आवक आणि दर (प्रतिक्विंटल) दिनांक आवक (क्विंटल) किमान कमाल सरासरी १३ डिसेंबर ४७७ २१५ ३६० ३२० १२ डिसेंबर ४२३ १४० ३६० २५० ९ डिसेंबर ४३९ १४० २८५ २१५ खरिपात नुकसान झाल्यानंतर दोन पैसे मिळतील, या अपेक्षेने पंधरा गुंठे क्षेत्रावर फ्लॉवर लागवड केली. त्यासाठी ४५ हजारांवर खर्च आला. आता भावच नसल्याने काढणी करणे सुद्धा परवडत नाही. काढणी करून बाजारात नेण्यासाठी खिशातून पैसे घालावे लागत असल्याने हतबल झालो. त्यामुळे विक्री करण्यापेक्षा शेतात जनावरे सोडली. - हृषिकेश मोरे, शेतकरी, मोरेनगर, ता. सटाणा

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com