उती संवर्धित रोपांच्या निर्यातीसाठी केंद्राचे प्रोत्साहन

कृषी आणि प्रक्रियायुक्त अन्न पदार्थ निर्यात विकास अधिकाऱ्यांच्या (एपीईडीए) वतीने उती संवर्धन वनस्पती रोपांच्या निर्यातीस प्रोत्साहन या विषयावर बेबिनारचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते.
Tissue cultured plants
Tissue cultured plantsAgrowon

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) ः कृषी आणि प्रक्रियायुक्त अन्न पदार्थ निर्यात विकास अधिकाऱ्यांच्या (एपीईडीए) वतीने उती संवर्धन वनस्पती रोपांच्या निर्यातीस प्रोत्साहन या विषयावर बेबिनारचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. देशभरातील जैवतंत्रज्ञान विभाग मान्यताप्राप्त उती संवर्धन प्रयोगशाळा या वेबिनारमध्ये सहभागी झाल्या होत्या. पाने, जीवित रोपे, कट फ्लॉवर आणि लागवड साहित्य यांचा या निर्यात प्रक्रियेत समावेश करण्यात येणार आहे.

सध्या नेदरलँड, अमेरिका, इटली, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, जपान, केनिया, सेनेगल, इथिओपिया आणि नेपाळ आदी प्रमुख दहा देशांमध्ये भारतातून उती संवर्धन वनस्पतींची निर्यात केली जाते. २०२०-२१ या वर्षात भारताची निर्यात १७.१७ दशलक्ष अमेरिकन डॉलर इतकी होती. एकूण निर्यातीपैकी निम्मी निर्यात ही नेदरलँडमध्ये केली जाते. या वेबिनारमध्ये एपीईडीएच्या अधिकाऱ्यांनी सहभागी प्रगोगशाळांना या देशांमध्ये सध्या असलेल्या उती संवर्धन वनस्पती रोपांच्या मागणीच्या ट्रेंडबाबत माहिती दिली. त्याचबरोबरीने निर्यात प्रोत्साहन शिखर मंडळाकडून कशाप्रकारे भारतीय निर्यातदारांना, उती संवर्धन प्रयोगशाळांना बाजारपेठांमध्ये प्रवेशासाठी मदत मिळू शकते याबाबतही माहिती देण्यात आली.

एपीईडीएच्या वतीने प्रयोगशाळांशी प्रथमच चर्चेच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्ताने एपीईडीएकडून प्रयोगशाळांना त्यांची कार्यप्रणाली, आवश्‍यक सूचना आणि प्रयोगशाळांना विश्‍वास आणि वनस्पतींचा दर्जा सुधारण्यासाठी करण्यात येणारे अन्य आर्थिक साह्य याबाबत माहिती देण्यात आली. जेणेकरून आयातदार देशांकडून ठरवण्यात आलेले वनस्पतींच्या आरोग्यासाठीचे निकष साध्य करून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेच्या स्पर्धेत या प्रगोगशाळा टिकून राहतील. उती संवर्धन रोपे तयार करण्याची देशातील क्षमता वाढविण्यासाठी निर्यातदारांनी विशिष्ट वनस्पती व पिकाच्या अनुवांशिक सामग्रीची माहिती पुरवण्यास एपीईडीएने सांगितले आहे. या माहितीच्या आधारे ही सामग्री उत्पादक देशांकडून आयात केली जाऊ शकेल.

या वेळी निर्यातदारांकडूनही एपीईडीएकडून देशात विविध वनस्पतींबाबतचे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन आयोजित करावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. यामध्यमातून उती संवर्धित वनस्पतींची रोपे, जंगली रोपे, कुंडीत वाढविलेल्या रोपांबरोबरच भारतात उपलब्ध असलेल्या शोभेच्या आणि मोकळ्या जागेत रोपे लागवडीसाठी उपलब्ध साहित्यासंदर्भात माहिती मिळू शकेल, असे निर्यातदारांकडून सांगण्यात आले.

प्रयोगशाळा, निर्यातदारांपुढील समस्या आणि आव्हाने

उती संवर्धन रोप प्रयोगशाळांनी उती संवर्धित वनस्पती रोपांसाठीचे साहित्य उत्पादन आणि त्यांच्या निर्यातीसंदर्भात प्रयोगशाळांसमोर असलेल्या समस्या आणि आव्हानांकडे या वेबिनारमध्ये लक्ष वेधले. निर्यातदारांकडून वाढत्या वीज दराबरोबरच प्रयोगशाळांमध्ये कुशल कामगारवर्गाची असलेली कमतरता, स्वच्छतेचा अभाव, लागवडीसाठीच्या सूक्ष्म प्रचलित साहित्याच्या वाहतूक खर्चात झालेली वाढ वन आणि विलगीकरण विभागाकडून घेण्यात येणारे आक्षेप यामुळे जीवित रोपे लागवडीच्या साहित्याच्या निर्यातीत अडचणी येत असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com