कापसातील ‘आयआरएम’ प्रकल्पाला केंद्राकडून निधी

गुलाबी बोंडअळीमुळे (Pink boll worm) गेल्या हंगामात ५० टक्‍के उत्पादकता प्रभावित झाली होती.त्या पार्श्‍वभूमीवर गुलाबी बोंडअळीच्या नियंत्रणासाठी केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या निधीतून आयआरएम (इनसेक्‍ट रजीस्टंन्स मॅनेजमेंट- IRM) हा प्रकल्प राबविला जात आहे.
Pink boll worm
Pink boll wormAgrowon

नागपूरः राज्याचे मुख्य पीक असलेल्या कापसातील (Cotton) गुलाबी बोंडअळीचे नियंत्रण आव्हान ठरले आहे. त्या पार्श्‍वभूमीवर गेल्या काही वर्षांपासून राबविण्यात येत असलेल्या कीड प्रतिकारक व्यवस्थापन या प्रकल्पाला केंद्रीय कृषी मंत्रालयाने (Agriculture Ministry Of India) यंदाच्या हंगामात राबविण्यासाठी मंजुरी दिली आहे, केंद्रीय कापूस संशोधन संस्थेच्या सूत्रांनी ही माहिती दिली.

गुलाबी बोंडअळीमुळे (Pink boll worm) गेल्या हंगामात ५० टक्‍के उत्पादकता प्रभावित झाली होती. त्यामुळेच देशात कापसाचा तुटवडा निर्माण होत प्रक्रिया उद्योजकांना वाढीव दाम मोजावे लागले. देशभरात इतर कारणांमुळे कमी झालेल्या उत्पादकतेमुळे देखील कापूस दरात (Cotton Price) तेजी आली होती. त्या पार्श्‍वभूमीवर गुलाबी बोंडअळीच्या नियंत्रणासाठी केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या निधीतून आयआरएम (इनसेक्‍ट रजीस्टंन्स मॅनेजमेंट- IRM) हा प्रकल्प राबविला जात आहे.

गेल्या चार वर्षांपासून राबविण्यात येणाऱ्या या प्रकल्पाच्या माध्यमातून गुलाबी बोंडअळीमुळे (Pink boll worm) होणारे नुकसान ३० टक्‍क्‍यांनी कमी झाल्याचा दावा करण्यात आला आहे. त्याच कारणामुळे या प्रकल्पाला यंदाच्या हंगामात राबविण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे.

चंद्रपूर, वर्धा, अमरावती, नागपूर, यवतमाळ, नांदेड, परभणी, जालना, अकोला, बुलडाणा व खानदेशातील काही जिल्ह्यांत या प्रकल्पाची अंमलबजावणी होईल. प्रकल्पात समावेशीत जिल्ह्यातील पाच गावे व त्यातील दहा शेतकऱ्यांच्या शेतावर गुलाबी बोंडअळी (Pink boll worm) नियंत्रणाचे प्रात्याक्षीक दाखविण्यात येणार आहे. या शेतकऱ्यांनी केलेल्या व्यवस्थापनाची माहिती इतरांनी घ्यावी व त्याआधारे आपल्या शेतातील बोंडअळीचे नियंत्रण करावे, असे यात अपेक्षित आहे.

आयआरएम (इनसेक्‍ट रेजीस्टंट मॅनेजमेंट) हा प्रकल्प गेल्या चार वर्षांपासून राबविण्यात येत आहे. गुलाबी बोंडअळीच्या (Pink boll worm) नियंत्रणासाठी असलेल्या या प्रकल्पाचे सकारात्मक परिणाम समोर आल्याने यावर्षी पुन्हा या प्रकल्पाच्या अंमलबजावणीकरता केंद्र सरकारने निधी दिला आहे. महाराष्ट्रात यंदा सुमारे ४० लाख हेक्‍टरवर कापसाची लागवड राहील, असा अंदाज आहे.

डॉ. वाय. जी. प्रसाद, संचालक, केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com