केंद्र सरकार शेतकरी, कामगारविरोधी : प्रकाश रेड्डी

केंद्र सरकार शेतकरी, कामगार विरोधी धोरण राबवत आहे. देशात प्रचंड महागाई वाढवणारे धोरण घेत आहे. रोजगार उपलब्ध नाही, शिक्षणाचा व्यापार सुरू आहे.
Prakash Reddy
Prakash ReddyAgrowon

नाशिक : केंद्र सरकार शेतकरी, कामगार विरोधी धोरण (Anti Farmer Policy) राबवत आहे. देशात प्रचंड महागाई (Inflation) वाढवणारे धोरण घेत आहे. रोजगार (Employment) उपलब्ध नाही, शिक्षणाचा व्यापार सुरू आहे. धार्मिक तेढ निर्माण करून राजकारण सुरू आहे. केंद्र सरकारचे धोरण जनतेवर अन्याय करणारे आहे. म्हणून येत्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव करावा यासाठी मोहीम राबविण्यात यावी, असे आवाहन भाकप ज्येष्ठ नेते कॉम्रेड प्रकाश रेड्डी यांनी केले.

Prakash Reddy
Indian Agriculture : सामान्य शेतकऱ्यांनी गुंफली यशमाला

नाशिक जिल्हा भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे २४वे भाकप जिल्हा अधिवेशन शनिवारी (ता. १०) कॉम्रेड दत्ता देशमुख सभागृहात द्वारका येथे आयोजित करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. भाकप सचिव मंडळ सदस्य राजू देसले यांनी प्रास्ताविक केले. या वेळी जिल्हा सचिव भास्कर शिंदे, महादेव खुडे, दत्तू तुपे, विराज देवांग, तलहा शेख आदी उपस्थित होते. या वेळी अधिवेशनात २१ ठराव सर्वसंमतीने मंजूर करण्यात आले.

अधिवेशनात मंजूर ठराव...

अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्तांना पंचनामा करून मदत करावी.

रस्त्यावरील खड्ड्यांमुळे नागरिकांचे झालेले मृत्यू व अपघात जबाबदार अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करा.

कामगार विरोधी कायदे रद्द करा.

ग्राहक विरोध असलेला वीजबिल कायदा-२०२२ रद्द करा.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com