
अकोला ः ‘‘शेती आधारित ग्राम संस्कृती (Rural Culture) आपल्या राष्ट्राच्या समृद्धीचा अविभाज्य घटक आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापरातून शाश्वत शेती (Sustainable Agriculture) साकारत कृषी विद्यापीठासह इतर तत्सम सहयोगी संस्थांद्वारे निर्मित तंत्रज्ञान आणि शिफारशी सोप्या स्थानिक भाषेत गावकऱ्यांपर्यंत पोहचवण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी मध्यवर्ती भूमिका बजावणे अपेक्षित आहे,’’ असे मत डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी व्यक्त केले.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातंर्गत कृषी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे ७ दिवसीय शिबिर आयोजित करण्यात आले. शिबिरात श्रमदान, कृषी मार्गदर्शन, बौद्धिक तसेच समाज प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
या वेळी ग्रामपंचायत नवनियुक्त सरपंच सतीष फाले, उपसरपंच अर्चना संजय दहातोंडे यांच्यासह कृषी अधिष्ठाता डॉ. श्यामसुंदर माने, सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रकाश नागरे, डॉ. सुधीर वडतकर, डॉ. देवानंद पंचभाई, डॉ. शैलेश हरणे, राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यापीठ समन्वयक डॉ. संदीप हाडोळे उपस्थित होते.
डॉ. गडाख म्हणाले,‘‘सहभागी विद्यार्थ्यांना ग्रामीण कार्यानुभव, प्रगत शेती तंत्रज्ञान वापरातील अडथळे आदींच्या निरीक्षणासह संशोधन व शिक्षणातील ताळमेळ साधण्यात सहायक ठरतील व यातूनच ग्रामविकासाची भावना वाढीस लागेल.’’
डॉ. संदीप हाडोळे यांनी शिबिराविषयी माहिती दिली. प्रास्ताविक सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रकाश नागरे यांनी केले. डॉ. माने व डॉ. वडतकर यांनीही मार्गदर्शन केले. विद्यार्थिनी श्रुती निचत व आस्था देशमुख यांनी सूत्रसंचालन केले.
अभिश्री सूर्यवंशी हिने आभार मानले. शिबिरासाठी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. अनिल खाडे, प्रा. डॉ. महेंद्र देशमुख, प्रा. डॉ. रवीश राऊत, प्रा. डॉ. सुधाकर चौधरी, ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य आणि गावकरी, विद्यार्थी - विद्यार्थिनी परिश्रम घेत आहेत.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.