रास्तभाव दुकानदारांना जनसुविधा केंद्राचे प्रमाणपत्र

सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत रास्तभाव दुकानातून धान्यासोबतच नागरिकांना इतर सुविधा पुरविण्याचे अनुषंगाने सीएससी ई -गव्हर्नन्स सर्विसेस इंडिया लि. या कंपनीमार्फत रास्तभाव दुकानांना सीएससी केंद्र सुरू करण्यास शासनाकडून मंजुरी देण्यात आली आहे.
Ration Shop
Ration ShopAgrowon

परभणी : परभणी जिल्ह्यात सावर्जनिक वितरण प्रणाली अंतर्गत १ हजार १८३ रास्तभाव पैकी ४८७ रास्तभाव दुकानदारांनी सी.एस.सी. केंद्र मिळण्यासाठी अर्ज दाखल केले असून, त्यापैकी ११४ रास्तभाव दुकानदारांना जनसुविधा केंद्र (सी.एस.सी.) केंद्राचा आय. डी दुय्यम प्राप्त करून घेतला आहे. दोन दुकानदारांना प्रमाणपत्र वितरित करण्यात आले.

Ration Shop
Cotton :गुलाबी बोंड अळीसाठी एकात्मिक नियंत्रण करावे

सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत रास्तभाव दुकानातून धान्यासोबतच नागरिकांना इतर सुविधा पुरविण्याचे अनुषंगाने सीएससी ई -गव्हर्नन्स सर्विसेस इंडिया लि. या कंपनीमार्फत रास्तभाव दुकानांना सीएससी केंद्र सुरू करण्यास शासनाकडून मंजुरी देण्यात आली आहे. त्यानुसार रास्तभाव दुकानातून धान्यासोबत इतर ऑनलाइन सेवा सशुल्क नागरिकांना पुरविण्यात येणार आहेत.

Ration Shop
Crop Damage : लाखांदूर तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करा

ज्यामध्ये पुरवठा विभागाशी संबंधित नवीन शिधापत्रिका मागणी, शिधापत्रिकेतील नावात दुरुस्ती, शिधापत्रिकेतील नाव कमी किंवा अधिक करणे, शिधापत्रिकेची मागणी करणे इत्यादी कामासोबतच आयुष्यमान भारत योजना, पंतप्रधान पीकविमा योजना, पी. एम. उज्वला कनेक्शन बुकिंग, पासपोर्ट आणि पॅनकार्डसाठी अर्ज, ई- वाहन सारर्थी ट्रान्स्पोर्ट सर्व्हीसेस, बँकिंग व्यवहार, टिकीट बुकिंग, वीजबिल इत्यादी सेवा या केंद्राकडून नागरिकांना पुरविण्यात येणार आहेत.

सी.एस.सी.करिता आय. डी. प्राप्त करून घेतलेल्या प्रभू ज्ञानोबा सोळंके आणि लक्ष्मण मुंढे या रास्तभाव दुकानदारांना सी. एस. सी. केंद्र मिळाल्याचे प्रमाणपत्र जिल्हाधिकारी आचंल गोयल यांच्यामार्फत वितरित करण्यात आले. या वेळी जिल्हा पुरवठा अधिकारी मंजूषा मुथा, जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक नीरज धामणगावे, सी. एस. सी. जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक राहुल शेळके उपस्थित होते. परभणी जिल्ह्यातील सर्व रास्तभाव दुकानदारांनी सी. एस. सी. केंद्र उपलब्ध करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी मंजूषा मुथा यांनी केले आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com